‘त्यावेळी ठाकरे म्हणाले, एकनाथ तू बोल, पण मी…’, संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

"जागावाटपाबाबतच्या तुमच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. 3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. उद्या आणि परवा हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत", असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

'त्यावेळी ठाकरे म्हणाले, एकनाथ तू बोल, पण मी...', संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 1:26 PM

गिरीश गायकवाड, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 8 मार्च 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिवच्या सभेत बोलताना तुळजा भवानी देवीची शपथ घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटं बोलत असल्याचं म्हणाले. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या याच दाव्यावर शिंदे गटाकडून आज संजय शिरसाट यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी काल ज्या सभेत अमित शाह खोटं बोलतात असं म्हणाले. त्यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजप आणि नंतरची शिवसेना असं होतं. पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपने हे सुद्धा मान्य केलं की आधीची अडीच वर्षे देतोय. हे खोटं आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावं. पण, भाजपसोबत जायचं नाहीच. हवं तर एकनाथ तू बोल पण, मी जाणार नाही. हे यासाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. प्रश्न नीतिमत्तेच्या असेल तर त्यांनी शपथपूर्वक सांगावं”, असं आवाहन संजय शिरसाट यांनी दिलं.

संजय शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “लाचार माणसांना मी अनेकदा सिल्व्हर ओकवर जाताना पाहिले आहे. लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिलं आहे”, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन केलेल्या टीकेलाही शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं. “संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांच्या निकालावर टीका करण्याचा जो प्रयत्न केलाय त्याने समजून घेतलं पाहिजे की, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले नाहीत किंवा स्टे आणला नाही. नार्वेकरांनी दरवेळेला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, राऊतांना जाणीव होती की आपण चुकीची घटना सादर केली आहे”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला

‘तुम्ही वांद्र्याच्या नाल्यात बुडू नका’

“आम्ही भिडणारे आहोत का काय ते काही कळत कळेल. तुमच्याकडे जी फुगीर भरती व्हायला लागली आहे, ज्यांनी शिवसेना प्रमुख, मातोश्री सोडली नाही त्यांना आता नेते बनवले आहेत”, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांवरही निशाणा साधला. “विनायक राऊत काय ओ? यांना दुसरं काही कामं नाहीत. आम्हाला अरबी समुद्रात जायचं आहे का काय? ते बघू. पण तुम्ही वांद्र्याच्या नाल्यात बुडू नका”, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

‘उठाव केला नसता तर त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं असतं’

दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी नुकतंच जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा कोकणात लहान-मोठा वाद आहे. पण, आमचा केसाने गळा कापला जात नाहीय. तसं असेल तर आम्ही रामदास कदम आणि भाजप दोघांनाही सांगू की संयमाने वागलं पाहिजे. उठाव केला नसता तर त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं असतं”, असं संजय शिरसाट म्हणाले.

‘ठाकरेंना तुम्ही अल्ला हू अकबर नारे द्यायला लावा’

संजय शिरसाट यांनी यावेळी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. “कसली आघाडी? उबाठाला कोणी विचारत नाही म्हणून बैठका बोलवल्या जात आहेत. काँग्रेसने सत्तेत जाताना जी युती केली होती ती काय होती? उद्धव ठाकरे यांना तुम्ही अल्ला हू अकबर असे नारे द्यायला लावा. ते सत्तेसाठी आणि मतांसाठी कोणत्याही स्तराला जातील. उद्धव ठाकरेंनी सर्वधर्म समभाव या भूमिकेतच राहीलं पाहिजे. पुढे हे 2 पक्ष त्यांना हिंदुत्व हा शब्द घ्यायला सुद्धा बॅन करतील. इतकी लाचारी झाली असती तर शिवसेना प्रमुखांनी पक्ष बंद केला असता”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.

जागावाटपावर संजय शिरसाट काय म्हणाले?

यावेळी संजय शिरसाट यांनी जागावाटपाबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. “जागावाटपाबाबतच्या तुमच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. 3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. उद्या आणि परवा हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.