शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काहीच फाटलेलं नाही, संजय शिरसाट यांचं मोठं विधान; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

2024मध्ये मोदीच पुन्हा सत्तेत येणार. त्यामुळे संजय राऊत यांच्या बोलण्याला अर्थ नाही. इंडिया बैठक कशी होईल याचीच त्यांना चिंता आहे. बैठका कोण काय देणार यासाठी आहे. काँग्रेसची भूमिकाही दरवेळी बदलत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काहीच फाटलेलं नाही, संजय शिरसाट यांचं मोठं विधान; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण
sanjay shirsatImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 2:30 PM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका उद्योगपतीच्या घरी भेट झाली. त्यामुळे या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. अजित पवार यांनी एवढा पक्ष फोडल्यानंतरही शरद पवार अजित पवार यांना भेटलेच कसे? असा सवाल केला जात आहे. हे दोन्ही नेते ठरवून तर राजकारण करत नाहीत ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. पवार काका पुतण्यांच्या या नातेसंबंधावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार आणि शरद पवार याच्यात काही फाटलेलं नाही. तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी करून राजकीय वर्तुळात खळबळच उडवून दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचं स्नेह भोजन हे 15 ऑगस्ट पूर्वी किंवा नंतर हे परदेशातून स्वातंत्र्य दिनासाठी आलेल्या राजदूतांसाठी असतं. ते आमदारांसाठी म्हणून नसतं. म्हणून उद्या जर मी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही तर नाराज आहेत म्हणून ब्रेकिंग चालवू नका, असं संजय शिरसाट म्हणाले. बच्चू कडू यांनी काय म्हटलं हे मला माहीत नाही. पण त्यांच्याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

प्रशासन कळायला अक्कल लागते

प्रशासन कळायला अक्कल लागते अंबादास दानवेंना ते अजून कळालेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तर मंत्रीपदासाठी झालेल्या ब्लॅकिंगवर आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावर त्यांनी अधिक भाष्य केलं नाही. गोगावले काय बोलले ते मला माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही हेतूने एकत्र

गिरीश महाजन यांनी केलेलं स्टेटमेंट योग्यचं आहे. दररोज भाजप आणि शिवसेनेकडे लोकांचा ओढा वाढत चाललाय, असं सांगतानाच आमचं जास्त ताणलं म्हणून तुटलं. बंदुक लावलेली माणसं जास्त काळ सोबत टिकत नाही. आम्ही हेतूने एकत्र आलो आहोत, असंही ते म्हणाले.

आधी मलिक यांना भूमिका घेऊ द्या

अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना भेटायला गेले होते. मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. मलिकांनी आता त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अल्लाहचं नाव घ्यावं. मलिक यांच्या मंत्रिमंडळाबाबत बोलण्या आधी ते कुठे जातात. ते आधी त्यांना ठरवू द्या. मग आम्ही भूमिका घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.