मुंबई: हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर शेतकरी आंदोलनाला आता आणखीनच हवा मिळाली आहे. रिहाना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने तिच्यावर टीका केली आहे. कंगनाच्या मदतीला एकीकडे अजय देवगन आणि अक्षकुमार धावून आलेले असतानाच तर ऐकेकाळची पॉर्नस्टार मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्गने रिहानाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड असं चित्रं निर्माण झालं आहे. दोन्ही इंडस्ट्रीमधील कलाकार का आमनेसामने आले आहेत? त्यावरचा हा खास रिपोर्ट… (scourge between bollywood vs hollywood actor after rihanna tweet)
शेतकरी आंदोलन काय आहे?
गेल्या 70 दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. शेतकरी आणि सरकार दरम्यान या विषयावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली केली होती. या रॅली दरम्यान हिंसा भडकली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डरवर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
रिहाना काय म्हणाली होती?
जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने म्हटलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.
कंगनाने फटकारले
अभिनेत्री कंगना रणौतने रिहानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’, असं कंगनाने म्हटलं आहे.
मिया म्हणाली, शेतकऱ्यांना मारणं बंद करा
मिया खलिफानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधील फोटोवर शेतकऱ्यांना मारणं बंद करा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पोस्टरवर शेतकरी आंदोलनावेळी दिल्लीमधील इंटरनेट बंद करण्यात आलं हे दिल्लीत काय चाललं आहे, असा सवाल तीन केला आहे. त्याशिवाय मिया खलिफानं शेतकरी आंदोलनाच्या समर्थना्र्थ ट्विट देखील केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये मिया खलिफानं कोणत्या मानवधिकारांचं उल्लंघन होत आहे? त्यांनी नवी दिल्लीच्या परिसरातील इंटरनेट बंदल केलं आहे? #farmerprotest तर दुसऱ्या ट्विटमध्ये Paid Actors, huh? पुरस्कार द्यायच्या वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. मी शेतकऱ्यांसोंबत उभी आहे, असही मिया खलिफा म्हणते.
“Paid actors,” huh? Quite the casting director, I hope they’re not overlooked during awards season. I stand with the farmers. #FarmersProtest pic.twitter.com/moONj03tN0
— Mia K. (Adri Stan Account) (@miakhalifa) February 3, 2021
अक्षयकुमारची सावध भूमिका
शेतकरी आंदोलनावरून अभिनेता अक्षयकुमारने सावध भूमिका घेतली आहे. त्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनाचं समर्थन केलं आहे. शेतकरी आपल्या देशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे. जे लोक दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं अक्षयने ट्विटमध्ये म्हटलं आहे. अक्षयने केंद्र सरकार आणि शेतकरी दोन्ही नाराज होणार नाहीत, अशा पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे. तसेच या ट्विटमध्ये त्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हा हॅशटॅगही वापरला आहे. (scourge between bollywood vs hollywood actor after rihanna tweet)
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. ??#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda https://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
अजय देवगन सुनील शेट्टींनी रिहानाला झापले
अजय देवगन आणि सुनील शेट्टी यांनी ट्विट करून रिहानाला अप्रत्यक्षपणे झापलं आहे. दोघांनीही आपल्या ट्विटमध्ये एकतेवर भर दिला आहे. कोणत्याही बाहेरच्या अपप्रचाराचा आपल्यावर प्रभाव पडता कामा नये, असं सांगतानाच अर्ध सत्य नेहमीच धोकादायक असतं, असं या दोघांनी म्हटलं आहे. दिग्दर्शक करण जोहरनेही शेतकरी मुद्द्यावरून होत असलेल्या विदेशी अपप्रचारावर टीका केली आहे. आपल्याला आपली एकी कायम ठेवली पाहिजे, असं सांगतानाच शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघेल, असं करण जोहर यांनी म्हटलं आहे. एकता कपूरनेही विदेशी अपप्रचारापासून सावध राहण्याचं आवाहन करतानाच सर्वांनी एकजूट राहण्याचं आवाहनही केलं आहे. (scourge between bollywood vs hollywood actor after rihanna tweet)
Don’t fall for any false propaganda against India or Indian policies. Its important to stand united at this hour w/o any infighting ??#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 3, 2021
स्वरा, रिचा, शिवानी रिहानाच्यापाठी
काही बॉलिवूडकरांनी रिहानाला लक्ष्य केलं असलं तरी काहींनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. स्वरा भास्करने रिहानाचे ट्विट रिट्विट करत अनेक इमोजी वापरून रिहानाचं समर्थन केलं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढानेही काहीही न बोलता रिहानाचं समर्थन केलं आहे. तर शिवानी दांडेकरनेही रिहानाचं ट्विट शेअर करून त्यावर This असं लिहून आपला पाठिंबा दर्शविला आहे. टीव्ही अभिनेत्री श्रुती सेठनेही रिहानाचं ट्विट रिट्विट करून आता कुठे या आंदोलनावर चर्चा सुरू झालीय, अशा आशयाची कमेंट केली आहे. डिझायनर फराह अली खाननेही रिहानाचं समर्थन केलं आहे. तर टीव्ही स्टार नकूल मेहताने आतापर्यंत रिहानाचं ट्विटर हँडल ब्लॉक का केलं गेलं नाही? असा सवाल केला आहे. (scourge between bollywood vs hollywood actor after rihanna tweet)
❤️??? https://t.co/FNnxzutVmA
— TheRichaChadha (@RichaChadha) February 2, 2021
संबंधित बातम्या:
जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !
जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?
सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?
(scourge between bollywood vs hollywood actor after rihanna tweet)