Eknath Shinde and Rahul Narvekar Secret Meeting | सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यात गुप्त बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणाऱ्या घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त बैठक पार पडली आहे. बंद दाराआड पार पडलेल्या या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde and Rahul Narvekar Secret Meeting | सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यात गुप्त बैठक
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 3:55 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतंच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी तातडीने वेळापत्रक जाहीर करावं. नाहीतर आम्ही वेळापत्रक जाहीर करु, असं कोर्टाने स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

कोर्टाने येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिलीय. कोर्टाने तसं म्हटलं देखील आहे. याशिवाय कोर्टाने याबाबत प्रसारमाध्यमांसमोर कोणतंही मत मांडण्यास मज्जाव केलाय. कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांसोबत दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी बसून वेळापत्रक ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या याचिकांचं वेळापत्रक जाहीर करणं बंधनकारक असणार आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आज अतिशय महत्त्वाच्या हालाचाली घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्षांची गुप्त बैठक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडलीय. एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड यावेळी चर्चा झालीय. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

गुप्त बैठकीत चर्चा काय?

दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर राहुल नार्वेकर वर्षा निवासस्थानाबाहेर पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांना मतदारसंघाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं नार्वेकरांनी सांगितलं. पण या भेटीतलं खरं कारण हे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील चर्चा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुढील पावलं काय उचलली पाहिजेत याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या गुप्त बैठकीनंतर राहुल नार्वेकर काय पावलं उचलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल.

‘यांची जाण्याची वेळ झालीय’

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीय. “सगळा महाराष्ट्र बघतोय. यांची जाण्याची वेळ झालीय. आता काय पालकमंत्र्यांचं घेऊन बसला आहात? अध्यक्षांच्या कृपेने काही काळ, त्यांचं आजचं मरण उद्यावर, उद्याचं परवावर ढकललं गेलं. पण तिरडी तयार आहे. फक्त ते कधी लेटायची यासाठी अध्यक्ष दिवस काढत आहेत. पेशंट गेलेला आहे. पण अध्यक्षांच्या रुपाने त्याला व्हेंटिलेटरवर जीवंत ठेवलेलं आहे. व्हेटिंलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.