‘मनसे’च्या धमकीनंतर ‘बिग बॉस’च्या सेटबाहेरील सुरक्षेत वाढ; फिल्मसिटीत मोठा पोलीस बंदोबस्त

फिल्मसिटीच्या संपूर्ण परिसरात ठराविक अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. | Big boss

'मनसे'च्या धमकीनंतर 'बिग बॉस'च्या सेटबाहेरील सुरक्षेत वाढ; फिल्मसिटीत मोठा पोलीस बंदोबस्त
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 4:15 PM

मुंबई: कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) याने मराठी भाषेविषयी अवमानकारक उद्गार काढल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. जान सानू याने जाहीररित्या माफी न मागितल्यास बिग बॉसचे चित्रीकरण बंद पाडू, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सध्या ‘बिग बॉस’चे चित्रीकरण सुरु असलेल्या फिल्म सिटीच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Security increases outside big boss show set in Film city)

फिल्मसिटीच्या संपूर्ण परिसरात ठराविक अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. फिल्मसिटीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अंगझडती घेतली जात आहे. तसेच फिल्म सिटीच्या कर्मचारी संघटनांमधील पदाधिकाऱ्यांनाही प्रवेश नाकारला जात आहे.

तत्पूर्वी जान सानूच्या वक्तव्याबद्दल कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीनामा पाठवण्यात आला आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे कलर्स वाहिनीने म्हटले होते.

तर दुसरीकडे मनसे अत्यंत आक्रमक पवित्र्यात आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण संपल्यानंतरही जान सानू याला मुंबईत काम करुनच देणार नाही. तसेच जान सानू मुंबईत दिसल्यास त्याला थोबडवणार, असा इशारा अमेय खोपकर दिला होता. त्यामुळे आता कलर्स वाहिनीच्या माफीनाम्यानंतर मनसे शांत होणार का, हे पाहावे लागेल. अन्यथा हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण? ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

संबंधित बातम्या:

Jaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा

Jaan Kumar Sanu Controversy | आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण : शालिनी ठाकरे

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

(Security increases outside big boss show set in Film city)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.