मुंबईत कोविडची लस घेतल्यानंतर दीड तासात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन

कोविड लसीकरणानंतर मुंबईत एक दुर्देवी घटना घडली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (senior citizen dies after Covid vaccine in mumbai)

मुंबईत कोविडची लस घेतल्यानंतर दीड तासात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन
corona vaccination
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 8:37 PM

मुंबई: कोविड लसीकरणानंतर मुंबईत एक दुर्देवी घटना घडली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिकेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. (senior citizen dies after Covid vaccine in mumbai)

काल ८ मार्च रोजी मुबंईतील एका खाजगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात ‘कोविड-१९’ लसीकरण सुरू होते. यावेळी एका ६८ वर्षीय नागरिकाने दुपारी ३.३१ वाजता कोविशिल्डची लस टोचून घेतली. मात्र, लसीची मात्रा दिल्यानंतर ते बेशुध्द झाले. यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक असलेले औषधोपचार करून त्वरीत त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु. दुर्दैवाने सायंकाळी. ५.०५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सदर बाब पोलिस यंत्रणेला कळविण्यात आली व त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला, अशी माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

समिती चौकशी करणार

या जेष्ठ नागरिकाचे शवविच्छेदन आज 9 मार्च रोजी केले जाणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अत्यंत आवश्यक बाब म्हणून लसीकरणानंतर घडणाऱ्या प्रतिकूल घटनेबाबतची चिकित्सा (Causality assessment) करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची त्वरित बैठक आयोजित करण्यात येणार असून ही समिती मृत्यू बाबतची कारणमिमांसा करणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

एका दिवसात 3 लाख 90 हजार लाभार्थ्यांना लस

केंद्र शासनाच्या आदेशान्वये मुंबईत 33 सार्वजनिक रुग्णालये व 38 खासगी रुग्णालये आदी एकूण 71 रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रात ‘कोविड-19’ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेदरम्यान 8 मार्चपर्यंत 1,62,598 आरोग्य कर्मचारी, 1,11,078 कोविड आघाडीवर काम करणारे कर्मचारी, 60 वर्षे व अधिक वयाच्या 1,05,867 व्यक्ती व 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेले 11,395 असे एकूण 3,90,938 लाभार्थ्याना कोविड लस देण्यात आली आहे.

लसीकरणानंतर ताप आणि अशक्तपणा

सर्वसाधारणपणे लसीकरणानंतर सौम्य प्रकारची लक्षणे लाभार्थ्यांमध्ये येतात. उदा. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, हलकासा ताप, अशक्तपणा, चक्कर येणे आदी. तसेच आतापर्यंत 16 लाभार्थ्यांना एक किंवा दोन दिवसासाठी रुग्णालयात देखरेखीसाठी दाखल करण्यात आले होते, असंही पालिकेने म्हटलं आहे. (senior citizen dies after Covid vaccine in mumbai)

संबंधित बातम्या:

भयानक ! नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या पोटात प्रायव्हेट पार्टद्वारे हवा भरली, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू

मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण…; महापालिका आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा

ठाण्यात कोरोनाचा धोका वाढला, ‘हे’ 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट ठरल्यामुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन

Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्रातील तीन शहरं लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील कोरोना स्थिती काय?

(senior citizen dies after Covid vaccine in mumbai)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.