सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर (ठाणे) : रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीची वाट पाहणाऱ्यांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना शहापूरजवळ घडली. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडला. धडक देणारी कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होती.
नेमकी काय घटना घडली?
शहापूरजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने कामानिमित्त जाण्यासाठी नेहमीच लोक महामार्गावरुन गाड्या पकडतात. त्यामुळे या ठिकाणी कायमच लोकांची गर्दी असते. याचवेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या आठ लोकांना धडक दिली. इनोव्हा कारने दिलेली धडक इतरी जोरदार होती की, एका जणाला बाजूला फेकून सात जणांना फरफटत नेत 25 फूट खोल नाल्यात इनोव्ह पडली.
चौघांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी
या अत्यंत भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीररित्या जखमी झाली आहेत. यात इनोव्हा कारचा मालकही गंभीर जखमी झाल आहे. या अपघातात काही गंभीर असलेल्या काही जणांचे हात तुटले आहेत.
या अपघातात जे जखमी झाले आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यात हलवण्यात आले. चार जण गंभीर जखमी आहे, त्यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
चालक फरार
दरम्यान, अपघातग्रस्त इनोव्हा कारचा चालक एअर बॅगमुळे बचावला आहे. मात्र, अपघातानंतर चालक फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.