मुंबईत 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : मुंबई पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरली आहे. परेलमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तिन्ही नराधमांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, एकावर अटकेची कायदेशीर कारवाई केली आहे. इतर दोन जणांना केवळ ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे, तीन वर्षीय चिमुकलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परेलमधील […]

मुंबईत 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मुंबई पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरली आहे. परेलमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तिन्ही नराधमांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, एकावर अटकेची कायदेशीर कारवाई केली आहे. इतर दोन जणांना केवळ ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे, तीन वर्षीय चिमुकलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परेलमधील एका को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीवर, तिच्याच शेजारी राहणाऱ्या नराधम तरुणाने त्याच्या इतर दोन मित्रांच्या साथीने लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या दिवशी पीडित चिमुकलीच्या शेजारील नराधम तरुणाने त्याच्या इतर दोन मित्रांना घरी बोलावलं. त्यानंतर पीडित चिमुकलीला त्याच्या घरात खेळण्यासाठी बोलवून, कॉमन पॅसेजमध्ये लैंगिक अत्याचार केला.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर, पीडित चिमुकलीच्या आईने तात्काळ चिमुकलीला इमारतीतच असलेल्या क्लिनिकमध्ये नेलं. तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी चिमुकलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेबाबत पीडित कुटुंबीयांनी किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिसांनी पीडित चिमुकलीच्या शेजारील नराधम तरुणाला अटक केली असून, त्याच्या इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. नराधमांपैकी एकजण अल्पवयीन आहे.

दरम्यान, महिला विकास महामंडळाच्या अध्याक्षा ज्योती ठाकरे आणि स्थानिक नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी केईएम रुग्णालयात जाऊन पीडित चिमुकली आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तिन्ही नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांसोबतच सगळेजण करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.