लंपट गटशिक्षण अधिकाऱ्याची महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी
शहापूर (ठाणे) : शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कार्यालयात विनयभंगाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रभारी गटशिक्षण अधिकारी असलेल्या आशिष झुंजारराव याने महिला विस्तार अधिकाऱ्याकडे शररीसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला विस्तार अधिकाऱ्याने शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून लंपट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या त्रासामुळे महिला अधिकारी त्रस्त झाल्या […]
शहापूर (ठाणे) : शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कार्यालयात विनयभंगाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रभारी गटशिक्षण अधिकारी असलेल्या आशिष झुंजारराव याने महिला विस्तार अधिकाऱ्याकडे शररीसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला विस्तार अधिकाऱ्याने शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून लंपट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या त्रासामुळे महिला अधिकारी त्रस्त झाल्या होत्या. शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लंपट गटशिक्षण अधिकाऱ्याविरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच, महिला अधिकाऱ्याने थेट पोलीस तक्रार दाखल केली.
पीडित महिला अधिकाऱ्याने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच लंपट आशिष झुंजारराव हा फरार झाला. शहापूर पोलीस आरोपी आशिष झुंजारराव याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, विनयभंग झालेल्या पीडित महिला अधिकाऱ्याने आरोपी आशिष झुंजारराव या लंपट अधिकाऱ्यांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे