Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : गृहखात्याच्या यंत्रणांनी…शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे असा साधला निशाणा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्याचा महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. तर या घटनाविषयी चिंता व्यक्त केली आहे. एक नाही तर सातत्याने या घटना घडत असल्याने त्यांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी त्यांनी गृहखात्याचे कान पण टोचले आहे.

Sharad Pawar : गृहखात्याच्या यंत्रणांनी...शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे असा साधला निशाणा
शरद पवारांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 2:04 PM

उद्या महाविकास आघाडीने राज्यात बंदची हाक दिली आहे. आज याविषयी उद्धव ठाकरे आणि नंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या घटना घडत असल्याने त्यांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी त्यांनी गृहखात्याचे कान पण टोचले आहे.

गृहखात्याचे असे टोचले कान

जे बदलापूरला घडलं. ते अत्यंत निषेधार्ह आहे. दुसरीकडे चिंताजनक आहे. दोन लहान मुलींवर अत्याचार झालं आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात होतो हे धक्कादायक आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया बदलापूरच नाही तर अनेक ठिकाणी उमटत आहे. बदलापूरला जो प्रकार झाला त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्वांनी मागणी केली आहे. सरकारने अशा प्रसंगाना आवर घालण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. गृहखात्याच्या यंत्रणेने सतर्क राहिलं पाहिजे. जिथे गरज आहे तिथे कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे काल काही बोलण्यात आलं ते बदलापूरपुरतं समिती नव्हतं. त्यानंतर तीनचार दिवसापूर्वी कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी अन्य ठिकाणी होत असल्याचं दिसत असेल, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बंद शांततेत व्हावा

कुठे बालिकांवर तर काही ठिकाणी मुलींवर होत होतं. हे चित्र राज्यात दुर्देवाने वाढत आहे. त्याबाबतचा उद्वेग आणि राग लोकांमध्ये आहे. त्यामुळे उद्या एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे. तो बंद शांततेत पार पाडू. यातून जनभावना समजून घेण्याची काळजी घ्यावी यासाठी हा बंद आहे. आमच्या पक्षातील सर्व सहकारी सहभागी होतील. राज्यातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. बंद शांततेत व्हावा, असे आवाहन पण त्यांनी केले.

गृहखात्यानं संवेदनशील व्हावं

एका वृत्तपत्राने अत्याचाराची आकडेवारी जाहीर केली आहे. हे थांबत नाही, वाढत आहे. त्यामुळे समाजाला, कायद्याची यंत्रणा आणि सरकारला जागृत करावं लागेल. मी कुणाला दोष देत नाही. पण शांततेच्या चौकटीत राहून ही काळजी घेता येईल. लोकांनी आपली रिॲक्शन व्यक्त केली. भावना व्यक्त केल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावं राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावं, असा चिमटा काढत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.