Sharad Pawar : शरद पवारांनी ‘द काश्मीर फाईल्स’वर मत व्यक्त करताच ट्विटरवर ट्रेंड? भाजप नेत्यांकडून ’93’ चा व्हिडीओ ट्विट, देशभर ट्रेंड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्सच्या (The Kashmir Files) मुद्यावरुन भाजपवर (BJP) टीका केलीय. चुकीचा प्रोपागंडा पसरवून देशात विखारी वातावरण पसरवलं जात असल्याचं शरद पवार म्हणाले होते.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्सच्या (The Kashmir Files) मुद्यावरुन भाजपवर (BJP) टीका केलीय. चुकीचा प्रोपागंडा पसरवून देशात विखारी वातावरण पसरवलं जात असल्याचं शरद पवार म्हणाले होते. विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट सेन्सॉर व्हायला नको होता. मात्र, त्याला करमाफी देण्यात आली. ज्यांच्यावर देश एकसंध ठेवण्याची जबाबदारी आहे ते लोकांना चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित करुन लोकांमधील रोष वाढवत असल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील अल्पसंख्यांक सेलला संबोधित करताना हे वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स संदर्भात भूमिका मांडल्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल शरद पवार यांनी जी माहिती दिली होती. त्या माहितीवरुन शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. भाचपच्या प्रीती गांधी यांनी शरद पवार यांचं 1993 संदर्भातील वक्तव्य ट्विटरवर पोस्ट केलं आहे. ट्विटवर शरद पवार यांच्या नावं ट्रेंड होऊ लागलं आहे. भाजप समर्थकांकडून शरद पवार यांच्यावर टीका केली जातेय.
शरद पवार काय म्हणाले होते पाहा व्हिडीओ
काश्मीरी पंडितांना हाकलून लावण्यास कोण जबाबदार?, शरद पवारांनी सांगितलं
शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्सवर गेल्या आठ दिवसात दोन वेळा भाष्य केलं आहे. काश्मीरमधून काश्मीरी पंडितांना हाकलून लावण्यात आलं हे खरं असलं त्यावेळी मुस्लीमांना देखील लक्ष्य करण्यात आलं होतं, असं शरद पवार म्हणाले. पाकिस्तानातील दहशतवादी गट काश्मीरी पंडित आणि मुस्लीमांवरील हल्ल्यांना कारणीभूत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
प्रीती गांधी यांचं ट्विट
In 2006, then Maharashtra CM Sharad Pawar admitted to lying about the 93 Mumbai blasts. He misled the investigation by purposely mentioning a 13th spot – the Muslim dominated Masjid Bunder area – to the list of 12 Hindu-dominated spots which actually suffered bomb blasts. 1/2 https://t.co/O91FVNTa7f
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) March 31, 2022
प्रीती गांधी काय म्हणाल्याशरद पवार यांनी मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोटात शरद पवारांनी 13 व्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती हेतूपूर्वक दिली होती. मुस्लीम बहूल मस्जिद बंदर भागात 13 वा स्फोट झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र, बॉम्बस्फोट झालेली 12 ठिकाणं ही हिंदू बहूल होती. यानंतर शरद पवार यांनी त्या घटनेमागे तामिळ टायगर्सचा हात असल्याचे पुरावे मिळाल्याचं सांगितलं होतं. तेच शरद पवार काश्मीरी पंडितांविषयी बोलताना तो चुकीचा प्रोपोगंडा असल्याचं म्हणतात हे निषेधार्ह असल्याचं प्रीती गांधी म्हणाल्या. शरद पवार यांच्यावर टीका करणारी अनेक ट्विटस सोशल मीडियावर करण्यात येत आहेत.
पाहा व्हिडीओ
Sharad Pawar the then CM of Maharashtra in 1993 ADMITS in an old interview “DELIBERATELY MISLED” people during 1993 bоmbings. “Instead of 11 bоmbings I said 12- one in Masjid Bandar- a minority area-JUST TO SHOW that bоmbings are not only in Hindu Areas but also in MusIim areas” pic.twitter.com/rCjLEBy46N
— Samarth (@samratsamarth25) April 1, 2022
मुंबईत शांतता नांदावी म्हणून शरद पवार यांनी खोटी माहिती दिलेली
मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर शांतता राखली जावी म्हणून शरद पवारांनी लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य केलं होतं. बाँबस्फोटामुळे हिंदू-मुस्लिम दंगल होऊ नये म्हणून पवारांनी 12 नव्हे तर 13 बॉम्बस्फोट झालेत आणि 13 वा बॉम्बस्फोट मस्जिद बंदरला झालाय असं टीव्हीवर येऊन सांगितलं होतं. शांततेसाठी पवार दुसऱ्यांदा खोटे बोलले बॉम्बस्फोटांनंतर हिंदू-मुस्लिमांतले वैर वाढू नये म्हणून पवारांनी आणखी एक खोटी माहिती सांगितली. बॉम्बस्फोटांमध्ये तमिळ टायगर्स या संघटनेचा हात असल्याचे पुरावे मिळत आहेत असं पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी या घटनेचा उल्लेख लोक माझे सांगाती या त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
इतर बातम्या:
Jalna | आमदार होऊन अडीच वर्षे झाली, निधीच नाही, जालन्याचे Congress MLA कैलास गोरंट्याल यांची खंत
Video : उत्तरप्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले – प्रकाश आंबेडकर