शरद पवार यांचे ते वक्तव्य खोटे ठरले, 1980 प्रमाणे करिश्मा आता करता आला नाही…पवारांची पॉवर संपली का?

Maharashtra Assembly Election Results 2024: 83 वर्षीय शरद पवार यांना 1980 मधील करिश्मा 2024 मध्ये करता आला नाही. अजित पवार गटातील आमदारांना पराभूत करण्याचा चंग बांधणाऱ्या शरद पवार यांना त्यांच्या गटातील उमेदवारांना निवडून आणता आले नाही. त्यांचे केवळ १२ आमदार निवडून आले.

शरद पवार यांचे ते वक्तव्य खोटे ठरले, 1980 प्रमाणे करिश्मा आता करता आला नाही...पवारांची पॉवर संपली का?
शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 2:29 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झंझावत आला. या झंझावतापुढे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणती त्याचा निकाल जनतेने दिला. राष्ट्रवादीतील बंडानंतर ८३ वर्षीय शरद पवार चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी बंड करणाऱ्या आमदारांना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात सभा घेतला. त्या ठिकाणी व्यूहरचना केली. तसेच त्या मतदार संघात जाऊन 1980 मध्ये काय झाले होते? त्याची आठवण शरद पवार करुन देत होते. तोच प्रकार 2024 मध्ये होणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. परंतु आता निकालानंतर शरद पवार यांचे ते वक्तव्य खोटे ठरल्याचे दिसून येत आहे.

1980 मध्ये काय झाले होते?

शरद पवार यांनी प्रचार सभेत 1980 मधील घटनेची आठवण करुन दिली होती. प्रचार सभेत बोलताना शरद पवार म्हणाले होते, 1980 मधील निवडणुकीत आमच्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते. त्यामुळे मी विरोधी पक्षनेता झाला होता. परंतु मी विदेशात गेलो असतातना तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी आमचा पक्ष फोडला. माझ्या पक्षातील 58 पैकी 52 आमदार त्यांच्या गटात दाखल झाले. त्यामुळे माझे विरोधी पक्षनेतेपद गेले होते. मग त्या 52 आमदारांचा पराभव करण्यासाठी तीन वर्ष मेहनत केली. त्या आमदारांच्या मतदार संघात युवकांना उमदेवारी दिली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सर्व 52 आमदारांचा पराभव झाला होता.

2024 मध्ये शरद पवार यांचा निश्चिच

1980 मधील घटनेची पुनरावृत्ती करण्याचा चंग शरद पवार यांनी बांधला होता. त्यासाठी 2024 मधील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबरोबर गेल्या आमदारांचा पडाव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शरद पवार यांनी हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील या अजित पवार गटातील दिग्गज उमेदवाराच्या मतदार संघात सभा घेतल्या. परंतु हे सर्व पराभूत झाले नाही. त्यामुळे शरद पवार यांचे ते विधान खोटे ठरले.

83 वर्षीय शरद पवार यांना 1980 मधील करिश्मा 2024 मध्ये करता आला नाही. अजित पवार गटातील आमदारांना पराभूत करण्याचा चंग बांधणाऱ्या शरद पवार यांना त्यांच्या गटातील उमेदवारांना निवडून आणता आले नाही. त्यांचे केवळ १२ आमदार निवडून आले.

उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.