शरद पवार तेव्हा कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते?; देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा हल्लाबोल

राष्ट्रपती राजवटीवर मी कालच भाष्य केलं आहे. मी खुलासा केला आहे तो खरा आहे. त्यावेळी शरद पवार यांनी आमच्यासोबत चर्चा केली होती. राष्ट्रपती राजवट लागू द्या. आम्ही सरकार बनवत नाही, असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला.

शरद पवार तेव्हा कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते?; देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा हल्लाबोल
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 2:50 PM

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारच 2019च्या राजकीय खेळी मागे असल्याचंही फडणवीस यांच्या दाव्यातून स्पष्ट झालं आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

शरद पवार यांनी 2019मध्ये आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्याआधी 2017 लाही त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. कोणत्या एजन्सीला घाबरून त्यांनी चर्चा केली होती? तेव्हा पवारसाहेब कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अजितदादांनीच स्पष्ट केलंय

शरद पवार यांच्या मान्यतेनेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं आहे. पवार साहेबांशी चर्चा करून आम्ही सह्या करूनच आलो आहोत हेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आता सगळं गेल्यानंतर आरोप करणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.

कुठे ना कुठे संधी मिळतेच

अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. राजकारणात कुठे ना कुठे संधी मिळतेच. अजितदादा हे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, आम्ही सर्व निवडणूका एकत्रित लढणार आहोत. काल मी अतिशय क्लिअर बोललो आहे. काही लोकाना माझं वाक्य समजलं नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून शिंदे दिल्लीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी दिल्लीला जाणार नाही. दिल्लीत नक्षलवादाबाबतची बैठक आहे. या बैठकीला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. त्यासाठी ते गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.