Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…
sharad pawar: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (msrtc) तासभर राडा केला. त्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (msrtc) तासभर राडा केला. त्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठी नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आज जे काही घडलं त्यावर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नेता शहाणा नसेलत तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होणारच. राजकारणात मतभेद असतात. पण संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची (maharashtra) परंपरा नाही, असंही पवारांनी सांगितलं. पवार यांच्या सिल्व्हर ओक यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठी नाही. त्या नेत्याला विरोध करणं हे तुमची माझी जबाबदारी आहे. आंदोलनाची माहिती कळल्यानंतर तातडीने अनेक सहकारी इथे पोहोचले. त्यासाठी मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. संकट आलं की आपण सर्व धावून येतो हेच तुम्ही दाखवून दिलं. त्याबद्दल धन्यवाद, असं शरद पवार म्हणाले.
कुणी तरी चुकीचा रस्ता दाखवला
आज जे घडलं त्यावर आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही. नेता शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो याचं उदाहरण आपण पाहिलं. राजकारणात मतभेद असतात. संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. पण गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यममातून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न होत होता. तो शोभनीय नव्हता. कर्मचारी आणि आमचा पक्ष यांचा गेल्या 50 वर्षापासून घनिष्ट संबंध होता. त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलं नाही. ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले तेव्हा आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कष्ट घेऊन सोडवले. पण यावेळी कुणी तरी चुकीचा रस्ता दाखवला. त्याचे दुष्परिणाम इथे दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
नैराश्यातून टार्गेट करण्याचा प्रयत्न
कारण नसताना काही महिने घरदार सोडून कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड आर्थिक संकट आलं. दुर्देवाने काही लोकांना आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली. जे नेतृत्व आत्महत्या करण्यासारखी स्थिती निर्माण करते, तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टीला जबाबदार असते. त्यातून जे नैराश्य आले ते कुठे तरी काढलं पाहिजे, ते इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यात दुसरं काही नाही, असंही पवार म्हणाले.
संबंधित बातम्या:
ST Andolan Mumbai: ज्या भाषणामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले, तो अॅड. सदावर्तेंचा बाईट ऐका