राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची बैठक होणार होती. परंतु बदलापूरचा विषय समोर आल्यामुळे ती बैठक स्थगित झाली. आता 27 ऑगस्ट रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील या तीन पक्षांसोबत डावे पक्ष आणि इतर पक्षांनी यावे, असे शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. लवकरात लवकर मतदार संघाचे निर्णय द्या. लोकांसमोर पर्याय द्या, अशी आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
बदलापूर घटनेबाबत बोलतान शरद पवार म्हणाले की, बदलापुरातील घटना म्हणजे लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या जनभावना होत्या. त्यामुळे त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावे.
बदलापूर प्रकरण ही धक्का देणारी घटना आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे. हा प्रकार बदलापूरपर्यंतच मर्यादीत नाही. मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा जागरूक करावी लागणार आहे. या प्रकरणी मी कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावे. या घटना वाढत आहेत थांबत नाही. त्यामुळे पोलिस दलाने अधिक संवेदनशील काम केले पाहिजे. परत गुन्हे दाखल करण योग्य नाही.
शरद पवार यांना पुन्हा झेड प्लस सुरक्षा दिली. विधानसभा निवडणुकीमुळे ही सुरक्षा दिली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारले. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या प्रकरणी मी जास्त बोलू इच्छित नाही. सुरक्षा राज्याने किती वर्ष दिली आहे. केंद्राने ही सुरक्षा दिली आहे. केंद्राने तीन लोकांना सुरक्षा दिली. त्यात माझे एक नाव आहे. केंद्र सरकारकडे आलेल्या माहितीनुसार, ही सुरक्षा दिली.
सहकारी चळवळीत राजकारण कधी येत नव्हती. यापूर्वी अस घडले नव्हते. राज्य सरकार एक नीती तयार करते सगळ्या अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत मिळत होते. पण आता तसे होताना दिसत नाही. आता राजकारण होत आहे. शपथ घेताना आपण न्यायाने राहू, असे होत पण तसे आता होताना दिसते नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.