महादेव जानकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट, जानकरांनी सांगितली आतली बातमी
Mumbai Sharad Pawar | महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आले आहे. यामुळे हा मतदार संघ महादेव जानकर यांना देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याची चर्चा सुरु आहे.
मुंबई | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच इतर पक्षातील लोकांना आपली दारे उघडी केली आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार आहे. या घडामोडी सुरु असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय झाले? त्याची माहिती त्यांनी दिली. महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपसोबत राहिले आहे.
शरद पवार माढा देण्याच्या तयारीत
माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आले आहे. यामुळे हा मतदार संघ जानकर यांना देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे शुक्रवारी महाविकास आघाडीची संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची शरद पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
काय झाले बैठकीत
शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्याचे महादेव जानकर यांनी मान्य केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या बाबतीत कोणतीही चर्चा झाली नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. पुढील काही दिवसांत मी पुन्हा सविस्तर भेट घेणार आहे. आणि त्यानंतर माध्यमांशी बोलणार आहे.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे याचा सवाल
मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. रिझल्ट देणारा आमदार आहे. मागील काळात मी गंगाखेड पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा रोवला, मात्र आपण मला साधा फोन करूनही कौतुक केलं नाही. मी तोंडावर बोलणारा स्पष्ट कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना कौतुकाची अपेक्षा असते पण आपण साधा फोनही केला नाही, असा जाब गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना विचारला.