Eknath Shinde : एवढे मंत्री, आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे.

Eknath Shinde : एवढे मंत्री, आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल
सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत ठरेलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 12:02 PM

मुंबई : शिवसेनेचे एवढे मंत्री आणि आमदारा रातोरात निघून गेले. बंड केले. कळले कसे नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्यासोबत अखेरचे अपडेट येईपर्यंत 45 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या बंगल्यावर ही बैठक होत आहे. यावेळी शरद पवार यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे. महाविकास आघाडीवर संकट असून अशा परिस्थितीत शरद पवार सक्रिय झाले असून बैठका ते घेत आहेत. संख्याबळ आणि तांत्रिक बाबींवर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. शिंदेंकडे 40हून अधिक आमदार असतील आणि ते भाजपाला पाठिंबा देणार असतील, तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे या पेचप्रसंगात काय निर्णय घ्यायचा, याविषयी पवार ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

‘शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न’

शरद पवार यांनी काल या राजकीय घडामोडींवर हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणाले होते. नेमके काय झाले, हे माहीत नाही. शिवसेनेकडून कळवले जात नाही, तोवर काहीही बोलणार नाही. याविषयी अभ्यास करू, बैठका घेऊ. मात्र तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, याविषयी तिन्ही पक्षांत एकमत आहे. जर मुख्यमंत्री बदलायचा असेल, तर तो निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, असे काल शरद पवार म्हणाले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.