Jitendra Awhad : ‘अरे अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही’, जितेंद्र आव्हाड यांचं खळबळजनक विधान
Jitendra Awhad : "मुंबईचे पोलीस काय करू शकतात हे दाऊदला माहीत आहे. त्यामुळे तो दुबईत आहे. मुंबईचे पोलीस हेच खरे भाई. त्यामुळे तो दुबईत जाऊन बसला. ज्या दिवशी हे ठरवतील त्या दिवशी आपलं जीणं मुश्किल होईल. त्यापेक्षा आपणच गेलेलं बरं म्हणून तो निघून गेला" असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“ही वंजारी विरुद्ध मराठा अशी लढाई नाही. ही माणुसकीची लढाई आहे. महाराष्ट्रातील माणुसकीला फुंकर घालण्यासाठी आपण एकत्र यावे ही इच्छा आहे. सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा? त्याच्या मृत्यूचं कारण सांगा? त्याच्या मृत्यूचं ठिकाण कुठे? कुणी सांगायला तयार नाही. ज्या इन्स्पेक्टरच्या कस्टडीत मेला असेल तर तो पोलीस अधिकारी अजून सेवेत कसा?” असा सवाल शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. “कस्टोडियल डेथ आहे. जेलमध्ये मेला, मारहाण झाली कुठे, किती वाजता मेला? मुख्यमंत्री म्हणाले त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होता. घरच्यांना विचारलं तर त्याला असा कोणताही त्रास नव्हता. औषधं सुरू नव्हती. ही जातीयवादाची लढाई आहे. मनुवाद वाढत आहे. मुजोर सत्ताधारी मनुवादाला बळ देत आहेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत आयोजित मोर्चात जितेंद्र आव्हाड बोलत होते.
“अक्षय शिंदेला मारला. निर्घृणपणे हत्या झाली. शासकीय यंत्रणा पोलिसात हस्तक्षेप करते, तेव्हा पोलीसच बदनाम होतात. त्याच्या हाताला बेड्या होत्या. त्याला जवळून मारलं. तो कसा रिव्हॉल्वर ओढणार? रिव्हॉल्वर त्याच्या हाताच ठसे नाही. अक्षय शिंदेबाबत बोलायला लोक तयार नाहीत. घाबरत आहेत. बलात्काराची केस आहे. समाज अंगावर येईल अशी लोकांना भीती वाटते. अरे अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली” असं खळबळजनक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
त्याला मारलं तो माझा मतदार संघ आहे
“जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतो. अचानक अक्षय शिंदे मेल्यावर ते कसे हजर होतात. यातील मोठी गोष्ट म्हणजे माणसाची मेमरी शॉर्ट आहे. विसरून जातील. या एकाच गेमवर लोक खेळतात. त्याला मारलं तो माझा मतदार संघ आहे. तिथे चहावाला आहे. त्याने मला सांगितलं काही तरी लफडा झाला. फायरिंग झाली. लगेच दुपारी सर्व ओपन झालं” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “जजने साांगितलं हे एन्काऊंटर नाही. मर्डर आहे. अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही अक्षय शिंदे प्रकरणात. ज्येष्ठ पोलीस अधिकारी पोलीस व्हॅनमध्ये जाऊन बसतो. मुंबईचे पोलीस काय करू शकतात हे दाऊदला माहीत आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरून शिव्या घातल्या
“मागच्या पाच वर्षात या सत्ताधाऱ्यांनी पोलीस खात्याची बदनामी केली आहे. पोलीस एकही काम स्वतंत्रपणे करत नाही. त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जात आहे. उदाहरण देतो. आमच्याकडे मर्डर झाला. इमानदार पोलीस अधिकारी होता नितीन ठाकरे. तो आरोपी पर्यंत पोहोचला. अटक करणार तोच मंत्रिमंडळातील मंत्र्याने त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरून शिव्या घातल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टरची बदली झाली. आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वत:च्या स्टेट्सला ठेवली. त्यानंतर कोणताही अधिकारी केस हातात घेत नाही. प्रत्येकाला वाटतं आपली बदली होईल” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
या सर्व आकांना काकांकडे पाठवा
“महाराष्ट्रात ही आका संस्कृती जन्माला आली आहे. हा इथला आका, तो तिथला आका… या सर्व आकांना काकांकडे पाठवा वरती. बंद करा हे. महाराष्ट्राचा सत्यानाश होणार आहे यातून. वंजारी समाजाचे मागच्या पाच वर्षात 40 आयपीएस अधिकारी निर्माण झाले. ही वंजारी समाजाची ताकद आहे. मुंबई सेंट्रलवरील 70 ते 80 टक्के लोक वंजारी आहेत. कष्टाळू लोक आहेत. पण दोन ते चार लोकांनी ठेका घेतला आहे वंजारी लोकांचा. त्यांनीच वाट लावली. मीही वंजारी आहे. मला अभिमान आहे. माझी आई आणि बाप या ठिकाणी भाजी विकायचे. जाती काही नसतात. माणुसकी धर्म मोठा आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठी राहा. त्यांना मदत करा. सर्वच ठिकाणी राजकीय असलं पाहिजे असं नाही. कराड सारखी वृत्ती आणि सोमनाथ सूर्यवंशीला मारणारी प्रवृत्ती ही विकृती आहे. त्याविरोधात लढलं पाहिजे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.