Sharad Pawar : संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेसशी चर्चा करुन, खासदारकीवर पवारांची सावध प्रतिक्रिया
त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.
संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेसशी चर्चा करुन, खासदारकीवर पवारांची सावध प्रतिक्रियाImage Credit source: tv9
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ सध्या संपत आला आहे. संभाजीराजेंना पुन्हा खासदारकीसाठी पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) विचारले असता त्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि संभाजीराजे यांची खासदारकी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना शदर पवार म्हणाले. छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मीदेखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.
शरद पवार यांचे ट्विट
अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ.
ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सुप्रीम कोर्टाने ज्या परिस्थितीत निवडणूक थांबवली तिथून निवडणुका सुरू करा असा निर्णय दिला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पवारांनी दिली आहे.
शरद पवरांची ओबीसी आरक्षणावरील प्रतिक्रिया
आज कोल्हापूरमध्ये विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सुप्रीम कोर्टाने ज्या परिस्थितीत निवडणूक थांबवली तिथून निवडणुका सुरू करा असा निर्णय दिला आहे. #PressConference#Kolhapurpic.twitter.com/FRthhbBBPN
राज्यात ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसी आरक्षणासाठी लागणाऱ्या इंपेरिकल डेटावरूनही बराच गदारोळ झाला आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्नही अनेक दिवसांपासून तसाच आहे. त्यामुळे आता पवार संभाजीराजेंबाबत काय भूमिका घेणार? आणि राज्य सरकार हे आरक्षणाचे प्रश्न कसे सोडवणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.