जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना ही मागणी केली आहे. (sharad pawar should take dhananjay munde resignation says chandrakant patil)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादीचे अध्यक्षव शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत तेच करायला हवं होतं. त्यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (sharad pawar should take dhananjay munde resignation says chandrakant patil)
चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असं सांगतानाच उद्धवजींनी जे केलं ते शरद पवार यांनाही मुंडे प्रकरणात करता आलं असतं. त्यांनी मुंडेचा राजीनामा घ्यायला हवा होता, असं पाटील म्हणाले.
अधिवेशनात शेतकरी आणि वीजबिलाचे प्रश्न उचलणार
उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड प्रकरणावर आवाज उठवणार का? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आता आम्ही अधिवेशनात इतर मुद्दयांवरून आवाज उठवणार आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्यावरही आम्ही आवाज उठवणार आहोत, असं पाटील म्हणाले.
एफआयआर झाला पाहिजे
विरोधी पक्ष, मीडियासह सर्वांनीच पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवल्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्याशिवाय मुख्यमंत्र्यांकडे काहीच पर्याय उरला नव्हता, असं सांगतानाच या प्रकरणात आता एफआयआर दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला हवा होता. मोठ्या दबावामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला असून या निमित्ताने सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे, असंही ते म्हणाले.
मुंडे, मेहबूब शेख प्रकरणात वेगवेगळी भूमिका
पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहोत, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे मेहबूब शेख प्रकरण असो किंवा धनंजय मुंडे प्रकरण असो या प्रकरणात सरकारने वेगवेगळी भूमिका घेतली आहे. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. (sharad pawar should take dhananjay munde resignation says chandrakant patil)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10.30 AM | 28 February 2021https://t.co/F46qaePY23#mahafast | #mahafast100 | #marathinews | #poojachavancase
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
संबंधित बातम्या:
‘राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा’, राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?
वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच राठोडांवर कारवाई नाही, चौकशी अधिकाऱ्याला निलंबित करा: देवेंद्र फडणवीस
संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार?
(sharad pawar should take dhananjay munde resignation says chandrakant patil)