पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं कधीही चांगलं, वेदना किती खोल हेही दिसतं; पवारांचे फडणवीसांना खोचक टोले

आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. (sharad pawar slams devendra fadnavis over CM post)

पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं कधीही चांगलं, वेदना किती खोल हेही दिसतं; पवारांचे फडणवीसांना खोचक टोले
sharad pawar
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 5:47 PM

मुंबई: आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नावर सविस्तर उत्तरे देत केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भडकावलं

मावळमधील गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलं. मावळमध्ये काय घडलं हे त्यांनी सांगितलं हे बरं झालं. त्यावेळी कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. मावळमध्ये जे झालं. शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्याला राजकीय पक्षाचे सत्ताधारी जबाबदार नव्हते. नेतेही जबाबदार नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हे प्रकर घडलं. फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली. मावळच्या शेतकऱ्यांचा नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती. पण नंतर यात सत्ताधाऱ्यांचा संबंध नसल्याचं मावळच्या लोकांच्या लक्षात आलं. तर परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रोत्साहित केलं. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असं मावळच्या लोकांना आज वाटतंय. मावळची वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल

त्याच मावळमध्ये भडकवण्याचं काम कोणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके 90 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या वर्षांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती. माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण काढलं हे बरं झालं. त्यांनी मावळची मानसिकता जाणून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

चीनसोबत चर्चा अयशस्वी

यावेळी त्यांनी भारत-चीनमधील तणावावरही भाष्य केलं. मला तुम्हाला काही प्रश्नांनावर बोलायचं आहे. देशाच्या सीमेबाबत मी थोडाबहुत अभ्यास केला आहे. आपला चीनसोबत डायलॉग सुरू आहे. त्याची चर्चा अयशस्वी झाली आहे. एका बाजूला चीनशी डायलॉग अयशस्वी होतोय. दोन्ही बाजूने हा डॉयलॉग अयशस्वी झाला आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे काही प्रतिक्रिया ऐकायला मिळतेय. पुंछमध्ये आपले पाच जवान शहीद झाले. हे सतत घडतंय ते चिंताजनक आहे. दिल्लीतील आमच्या अन्य पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलतोय. केंद्राशीही बोलत आहे. एकत्र बसून सर्वांनी सामुहिक भूमिका घेण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.

चिंतेचं कारण नाही

महिन्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी ए.के. अँथोनी आणि मला बोलावून आम्हाला चीनवर काय चाललं याचं ब्रिफिंग दिलं. त्यातून आम्ही एका गोष्टीचा निष्कर्ष काढला. राजकीय प्रश्नावर आपला संघर्ष होऊ शकतो. पण या प्रश्नावर आपण मतभेद आणि राजकारण न आणता संरक्षण खात्याशी आम्ही सहमत असू. संरक्षण खातं जी काही भूमिका घेईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ. कालच्या प्रकाराने पुन्हा एकदा एकत्र बसण्याची वेळ आली आहे. दिल्लीत गेल्यावर काही सहकाऱ्यांशी चर्चा करू. काही लोकांशी फोनवर बोललो. देशातील जनतेला सतर्क करणार आहोत. अर्थात चिंतेचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

परमबीरांच्या बेनामी मालमत्तेच्या सुरस कथा; पुनमियाच्या बनावट उताऱ्याला सरकारी कचेरीतून फुटले पाय, संशयाचे धुके गडद

(sharad pawar slams devendra fadnavis over CM post)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.