Dhananjay Munde Case : देशाच्या प्रमुखांनीही निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली होती; पवारांचा भाजपला टोला
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (sharad pawar taunt bjp over dhananjay munde rape case)
मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पवारांनी ही मागणी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावली आहे. देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. (sharad pawar taunt bjp over dhananjay munde rape case)
शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंडे प्रकरणावर मीडियाशी सविस्तर संवाद साधताना मीडियाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊन या प्रश्नाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंनी शपथपत्रात माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी पाहाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी लगावला.
भाजपची कोंडी
भाजप नेत्यांकडून मुंडेंवर होणाऱ्या टीकेचाही पवारांनी समाचार घेतला. सत्ता हातातून गेल्याने काही लोक अस्वस्थ आहेत. त्यामुळेच ते टीका करत आहेत, असं पवार म्हणाले. त्यांच्याच एका नेत्याने प्रकरण संयमाने घेण्यास सांगितलं आहे. ज्यांनी हे विधान केलं ते राज्याचे माजी प्रमुख होते. शिवाय भाजपच्याच एका माजी आमदारानं त्या महिलेवर आरोप केले आहेत, असं सांगत पवारांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
संयम ठेवावा लागतो
पोलीस विभाग चौकशी करेल. आमचं हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी, असं सांगतानाच गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं, पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं. (sharad pawar taunt bjp over dhananjay munde rape case)
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिकाhttps://t.co/2qdxQ6mfso#SharadPawar #DhananjayMunde #NCP #renusharma
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
संबंधित बातम्या:
Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?
धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…
सत्य समोर यायलाच हवे; समर्थकांचा सोशल मीडियातून DM ना सपोर्ट
(sharad pawar taunt bjp over dhananjay munde rape case)