शरद पवार भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार, आयोगाला पाठवलं पत्रं

| Updated on: Feb 22, 2022 | 12:52 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे भीमा कोरेगावप्रकरणी (bhima koregaon) आयोगासमोर हजर राहणार आहेत. येत्या काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडणार आहेत. पवारांनी तसे आयोगाला लेखीपत्राद्वारे कळवले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी तशी माहिती दिली आहे.

शरद पवार भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार, आयोगाला पाठवलं पत्रं
शरद पवार भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार, आयोगाला पाठवलं पत्रं
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे भीमा कोरेगावप्रकरणी (bhima koregaon) आयोगासमोर हजर राहणार आहेत. येत्या काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडणार आहेत. पवारांनी तसे आयोगाला लेखीपत्राद्वारे कळवले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी तशी माहिती दिली आहे. शरद पवार हे आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पवारांकडून मात्र त्याला दुजोरा देण्यात आला नव्हता. पहिल्यांदाच आता पवारांनी आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याचं कळवलं आहे. मात्र, कधी उपस्थित राहणार हे कळवलं नाही. परंतु, पवार आयोगाकडे नेमकं काय बाजू मांडणार आहेत? कोणते मुद्दे आयोगाकडे सादर करणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आयोगांकडून पवारांना काय प्रश्न विचारली जाणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे पवारसाहेब नक्कीच आयोगासमोर हजर होतील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश

दरम्यान, दोन वर्षानंतर कोरोनाबाबत दिलासादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. राज्यात जवळपास 800 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी ते होमक्वॉरंटाईन आहेत. मुंबईत डबल डिजिट आकडा आला आहे. ही सगळी परिस्थिती पहाता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

जयंत पाटलांची टीका

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. सत्ता नसली की माणसाचे संतुलन बिघडते, भाजपची तशी परिस्थिती झाली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. प्रत्येक आमदारला हाताळून सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला मात्र १७० आमदारांच्या जोरावर सरकार मजबूत उभे आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवत आहे असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. बिजू अण्णा ज्या भाजप पक्षात काम करत होते तिथे कार्यकर्त्यांना गरजेपूरते वापर करण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

 

संबंधित बातम्या:

हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण! पण कोण कुत्रा अन् कोण मांजर हे पहायला पाहिजे, शिवसेना-भाजप वादावर काय म्हणाले आठवले?

या कर्मचाऱ्यास मारहाण, उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना दिलासा, देशभरात गाजलेले प्रकरण!

Maharashtra News Live Update : हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची आज कॉनक्लेव्ह’