BIG BREAKING | दिग्गज रडले, कार्यकर्त्यांचा आक्रोश, अखेर शरद पवार भूमिका मांडणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या सर्व घडामोडींवर अखेर शरद पवार आपली सविस्तर भूमिका मांडणार आहेत. शरद पवार आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.

BIG BREAKING | दिग्गज रडले, कार्यकर्त्यांचा आक्रोश, अखेर शरद पवार भूमिका मांडणार
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 4:31 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या निवड समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा नामंजूर करण्याचा आणि शरद पवार यांनाच अध्यक्षपदी काय ठेवायचं असे दोन प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. निवड समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं खुद्द शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शरद पवार हे निवड समितीचं म्हणणं ऐकतात की दुसरा काही मार्ग काढतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्या घडामोडींनंतर आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना प्रचंड वेग आलेला होता. या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहात घेराव घातला. त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घालण्याची विनंती केली. पण शरद पवार तयार नव्हते.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन सुरु आहे. या दरम्यान शरद पवार यांनी काल कार्यकर्त्यांची भेट घेत तुमच्या मनासारखं होईल. तुम्हाला दोन दिवसांनी पुन्हा असं आंदोलनाला बसावं लागणार नाही, असं म्हणत स्पष्ट संकेत दिलं होतं.

अखेर शरद पवार भूमिका मांडणार

शरद पवार यांच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे किंवा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पक्षाध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याशिवाय शरद पवार हे अध्यक्षपदी कायम राहणार तर सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं जाईल, अशा चर्चांना उधाण आलं. पण निवड समितीने आजच्या बैठकीत शरद पवार यांना अध्यक्ष ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. याबाबत शरद पवार यांना विनंती केली जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

या सगळ्या घडामोडींनंतर आता शरद पवार यांची भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अखेर या विषयी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार लवकरच आपली भूमिका मांडणार आहे. शरद पवार आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.