शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, वळसे-पाटीलही पोहोचले; चर्चा नेमकी कशावर?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. (sharad pawars meeting with cm uddhav thackeray, reached at sahyadri guest house)

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, वळसे-पाटीलही पोहोचले; चर्चा नेमकी कशावर?
sharad pawar
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 1:01 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही पोहोचल्याने बैठकीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काही वेळा पूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तपास यंत्रणांच्या कारवायांवर चर्चा

गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या निकटवर्तीयांच्या घर, कार्यालयांवर धाडी पडल्या आहेत. एक दोन दिवस नाही तर सहा सहा दिवस आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे मारले आहेत. तसेच भाजपचे नेते या कारवाईत बरंच घबाड सापडल्याचा दावाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतच दहा हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. हे पॅकेज तुटपूंजं असल्याचं खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनीही म्हटलं होतं. हे पॅकेज वाढवून देण्याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वीज संकट आणि केंद्राकडील थकबाकीवरही चर्चा?

या बैठकीत राज्यातील वीज संकट, कोळश्याचा पुरवठा, एसटीची परिस्थिती आदी मुद्दयांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केंद्र सरकारकडे राज्याचे जीएसटीचे आणि इतर किती पैसे बाकी आहेत यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आणि आगामी निवडणुकांसंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार सक्रिय

पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी मारल्यापासून शरद पवार सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवडाभरात पवारांनी तीनदा मीडियाशी संवाद साधून आयकर विभागाच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. लखीमपूर हिंसा, चीनशी निष्फळ ठरलेली चर्चा आणि इतर मुद्द्यांवरूनही पवारांनी केंद्राला घेरले होते. त्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते असं बोललं जात आहे.

बैठकीला फक्त राष्ट्रवादीचे नेते

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला केवळ राष्ट्रवादीचे नेतेच उपस्थित आहेत. या बैठकीत काँग्रेसच्या एकाही नेत्याला किंवा मंत्र्याला बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या:

‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला

VIDEO: राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

कुठे हिमालय, कुठे टेकाड, टेंगूळ; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका

(sharad pawars meeting with cm uddhav thackeray, reached at sahyadri guest house)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.