माझा नवरा सोबत आला आहे कापूनचं टाकते त्याला, शर्मिला ठाकरे असं का म्हणाल्यात?
आता माझा नवरा आलाचं आहे त्याला कापूनचं टाकते पूर्ण. त्यानी आग्रहानं आणलं आहे, त्याचा गैरफायदा घेऊन टाकते, असं शर्मिला ठाकरे भर सभेत म्हणाल्या.
मुंबई : माझ्या नवऱ्यासमोर भाषण करणं म्हणजे टीचर बाजूला असताना त्याच्यासमोर पेपर लिहिण्यासारखं आहे काय लिहिते तू… असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. प्राजक्तानं सांगितलं शुभेच्छा देशील म्हणून तेव्हा माझ्या पोटात गोळा उठला. विश्वासराव आणि माझ्या नवऱ्यासमोर भाषण करणं म्हणजे टीचर समोर असल्यावर पेपर सोडविण्यासारख आहे. सोनसळ्याचं महत्त्व असं आहे की,हल्ली डेस्टीनेशन वेडिंग हे खूप मोठं फॅड आलंय. श्रीमंत लोकं डेस्टीनेशन वेडिंग करतात. मध्यमवर्गीय गोवा, कोकण येथे जाऊन लग्न करतात. तिथं जाताना सोनं, चांदी, हिऱ्याचे दागिने नेऊ शकत नाही.
महागडे दागिने विमानात नेऊ शकत नाही. परवानगी काढून नेलंही तरी हॉटेलच्या लॉकरमध्ये कसं ठेवायचं याचं टेंशन असतं. कारण डेस्टीनेशन वेडींगमध्ये आजचं संध्याकाळी, संध्याकाळी घातलेलं दुसऱ्या दिवशी घातला येत नाही. प्रत्येक फंशनला वेगळं लागतं.
हॉटेलमध्ये गेल्यास तीन सेकंदात लॉक झालेलं उघडून देतो. त्या लॉकरला काहीही अर्थ नसतो. कोचीला लग्नाला जायचं आहे. तिथं काय न्यायचं असा प्रश्न होता. आता माझा नवरा आलाचं आहे त्याला कापूनचं टाकते पूर्ण. त्यानी आग्रहानं आणलं आहे, त्याचा गैरफायदा घेऊन टाकते, असं शर्मिला ठाकरे भर सभेत म्हणाल्या.
महालक्ष्मी, तुळजाभवानी येथील देवस्थानात जुने दागिने आहेत. छत्रपती यांनी दिलेले दागिने देवस्थानात आहेत. दिवाळी, पाडवा अशावेळी जुने अलंकार काढतात, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली. नवऱ्यासमोर भाषणाची संधी मिळाली. याबद्दल आयोजकाचं आभारही शर्मिला ठाकरे यांनी मानलं.