Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांचं ‘ते’ आव्हान शिंदे गटाच्या रणरागिणीने स्वीकारलं; म्हणाल्या, पराभव व्हावा अशी…

तुम्हाला धमकी देण्याचीच इच्छा असेल, तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक वरळीतून लढायला तयार आहेत.

आदित्य ठाकरे यांचं 'ते' आव्हान शिंदे गटाच्या रणरागिणीने स्वीकारलं; म्हणाल्या, पराभव व्हावा अशी...
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 11:47 AM

मुंबई: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिलं आहे. आदित्य यांचं हे आव्हान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्वीकारलं आहे. पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांना तुमच्या विरोधात लढण्याची गरज नाही, असं आव्हानच शीतल म्हात्रे यांनी दिलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकलं. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोकं ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

साधं कार्यालयही नाही

आदित्यजी, तुम्हाला एक प्रश्न विचारते. वरळीतून आपल्याला 6 हजाराच्यावर नोटाची मते मिळाली आहेत. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचं साधं जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचं असेल तर तुम्हाला भेटता येत नाही अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

तीन तीन आमदार द्यावे लागले

तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात. पण तुम्हाला त्या वरळीत दोन अधिक आमदार द्यावे लागले. एका वरळीत तीन तीन आमदार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला माजी नगरसेवक संतोष खरात सारखी व्यक्ती ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले, असंही त्यांनी सांगितलं.

धमकी देण्याची इच्छाच असेल तर

तुम्हाला धमकी देण्याचीच इच्छा असेल, तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक वरळीतून लढायला तयार आहेत. त्यासाठी शिंदे साहेबांना वरळीच्या मैदानात उतरण्याची गरज नाहीये, असंही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांची काल वरळीत सभा झाली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी विधानसभा मतदारसंघातून लढून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता ते पाहतोच. तुम्ही कितीही यंत्रणा लावा, कितीही खोके आणा, इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. आम्ही तुम्हाला पराभूत करणारच, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.