“हाच माणूस म्हटला की, जे गेले ते गेले, आता त्यांना…”; ‘या’ आमदारानं बंडखोरीचं कारण सांगितलं…

संजय राऊत यांच्या अशा वागण्यामुळे शिवसेनेतून आमदार गेले आहेत. त्या काळात खासदार संजय राऊत यांचा उद्धवसाहेबांवर काय पगडा होता हे समजू शकले नाही मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे हेही काही बोलू शकले नाही.

हाच माणूस म्हटला की, जे गेले ते गेले, आता त्यांना...; 'या' आमदारानं बंडखोरीचं कारण सांगितलं...
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 5:14 PM

बुलढाणाः एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारला पायउतार केले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आणले. त्यामुळे शिंदे गटातील लोकप्रतिनिधींवर गद्दारीची शिक्का मारत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात होता. मात्र आता आमदार संजय गायकवाड यांनी आता त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरच्या आमदार आणि खासदारांना बंडखोरी का करावी लागली होती.

त्याची त्यांनी कारणं सांगितली होती. त्या बंडखोरीविषयी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

ते म्हणाले की, ज्यावेळी आमदार नाराज होऊन बाहेर पडले, त्यावेळी मंत्री सुद्धा मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले होते.

त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले की, हे लोक आपलेच आहेत, त्यांना परत बोलवा. मात्र खासदार संजय राऊत हाच माणूस म्हटला की, जे गेले ते गेले. आता त्यांना वापस बोलवण्याची गरज नसल्याचे त्यांनी त्यांना सांगितले.

यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, अत्यंत घाणेरड्या शब्दात तो बोलला होता. त्यामुळे उरलेले सगळेच लोक शिवसेनेतून निघून गेले असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी सांगितली.

आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांच्या अशा वागण्यामुळे शिवसेनेतून आमदार गेले आहेत. त्या काळात खासदार संजय राऊत यांचा उद्धवसाहेबांवर काय पगडा होता हे समजू शकले नाही मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे हेही काही बोलू शकले नाही.

आणि या सर्व प्रकाराला कारणीभूत संजय राऊत आहे असाही जोरदार हल्लाबोल संजय गायकवाड यांच्याकडून करण्यात आला. तर राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली गेली आहे असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना अजून मंत्रिपद मिळाले नाही त्याबद्दल त्यांच्या नाराजीचा सूर माध्यमांमधून दिसून येत आहे.

त्यांच्या नाराजीचे कारण विचारताना संजय गायकवाड म्हणाले की, मंत्री मंडळ विस्तार व्हावा , ही त्यांची आणि आमची अपेक्षा असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पण अधिवेशन पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा विश्वासही संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.