Shiv Sena MLA Disqualification Case | ठाकरे गटाच्या युक्तिवादावर शिंदे गटाचा आक्षेप, विधानसभा अध्यक्षांसमोर नेमकं काय घडलं?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी ठाकरे गटाने मांडलेल्या एका भूमिकेवर शिंदे गटाने आक्षेप घेतला.

Shiv Sena MLA Disqualification Case | ठाकरे गटाच्या युक्तिवादावर शिंदे गटाचा आक्षेप, विधानसभा अध्यक्षांसमोर नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 4:22 PM

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. या प्रकरणी एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांचं वेळापत्रक आजच्या सुनावणीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना विचारले. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडलेल्या युक्तिवादावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय.

ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. “आम्ही वारंवार तुमच्याकडे मागणी करतोय. महत्त्वाचा मुद्दा हा अपात्रतेचा आहे. त्यासाठी इतर याचिका विचारात घेण्याची गरज नाही. महत्त्वाची याचिका निकाली काढा”, अशी भूमिका ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला.

शिंदे गटाचा नेमका आक्षेप काय?

“सर्व याचिका एकत्र करा. आमची मागणीवर विचार का केला जात नाही?”, असं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. “सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्रित नको”, असा आक्षेप शिंदे गटाचे वकील अनील साखरे यांनी नोंदवला आहे. पण सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली तर या प्रकरणावर लवकर निकाल घेता येईल. सर्व याचिकांचा मुद्दा हा अपात्रतेचाच आहे. त्यामुळे सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केलाय. पण याच युक्तिवावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय.

‘आम्हाला शेड्यूल 10 लागू होत नाही’

दरम्यान, शिंदे गटाच्या वकिलांकडून आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला. “आम्हाला शेड्यूल 10 लागू होत नाही. कारण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आमच्याविरोधात शेड्यूल 10 नुसार कारवाई होऊ शकत नाही”, अशी भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी मांडली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.