AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहापूरच्या शिवसैनिकाचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन; मुख्यमंत्री शिंदेंकडून मदत अन् कुटुंबीयांचं सांत्वन

काळे कुटुंबाला तातडीची 1 लाखाची मदत केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मृत भगवान काळे यांच्या कुटुंबासोबत संपर्क करून अजून दोन लाख रुपये मदत आणि मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचे जाहीर केले.

शहापूरच्या शिवसैनिकाचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन; मुख्यमंत्री शिंदेंकडून मदत अन् कुटुंबीयांचं सांत्वन
एकनाथ शिंदे (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 10:01 PM

शहापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. यातील 1 लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी आज काळे कुटुंबीयांना सुपूर्द केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वदेखील शिंदे यांनी स्वीकारले आहे. कसारा येथील वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांसोबत भगवान काळे हे मातोश्रीवर गेले होते. बैठक सुरू असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा (Heart attack) तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काळे कुटुंबीयांचा एकमेव आधार हरपला आहे.

शिंदेंनी केलं कुटुंबाचं सांत्वन

भगवान काळे यांचा मातोश्रीबाहेर वाट पहाताना मृत्यू झाल्याची बातमी सर्वच माध्यमांनी केली होती. मात्र तरीही या कुटुंबाचे साधे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक दौऱ्यावर होते. येताना जाताना ते कसारामार्गेच नाशिकला गेले. परंतु तरीदेखील त्यांना क्षणभर थांबून काळे कुटुंबीयांचे सांत्वन करावे असे वाटले नाही, याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनादेखील आश्चर्य वाटले. एवढेच काय मातोश्रीवरून काळे कुटुंबाच्या सांत्वनासाठी साधा संपर्कही कुणी केला नाही, अशी चर्चा शिंदे गटाकडून करण्यात येत होती.

हे सुद्धा वाचा

‘दुःखद प्रसंगात आपण काळे कुटुंबीयांच्या सोबत’

ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच यांनी त्यांचे सहकारी शिवसेना ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठवून काळे कुटुंबाला तातडीची 1 लाखाची मदत केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मृत भगवान काळे यांच्या कुटुंबासोबत संपर्क करून अजून दोन लाख रुपये मदत आणि मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचे जाहीर केले. या दुःखद प्रसंगात आपण काळे कुटुंबीयांच्या सोबत असून त्यांना लागेल ती सर्व मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळे कुटुंबाला सांगितले आहे.

...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.