Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडद्यामागे हालचाली वाढल्या, शिंदेंच्या ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार, काय घडतंय?

शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळ विस्तार लवकर करावा, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजेय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत, लोकसभा निवडणुकीत ज्या विधनसभा मतदारसंघात मतांची आघडी मिळाली नाही त्या आमदारांना समज देण्यात आली, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

पडद्यामागे हालचाली वाढल्या, शिंदेंच्या 'वर्षा' बंगल्यावर शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार, काय घडतंय?
शिंदेंच्या 'वर्षा' बंगल्यावर हालचाली वाढल्या
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:45 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज अचानक हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आज शिवसेनेच्या जवळपास सर्व आमदार-खासदारांनी उपस्थितीत लावली. त्यामागील कारणही अगदीत तसंच आहे. एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदार-खासदार आणि लोकसभेतील पराभवी उमेदवारांची बैठक बोलावली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांनी निधीवाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत निधीवाटपाबाबत बोलणार असल्याची माहिती आमदारांना दिली. या बैठकीत निवडणुकीच्या निकालाची समिक्षा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत उशिरापर्यंत उमेदवार जाहीर झाले नाही. त्यावर चर्चा झाली. विधानसभा निवडणूकीत लवकर उमेदवार जाहीर करणार, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत आमदारांना दिली.

या बैठकीत आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळ विस्तार लवकर करावा, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजेय या बैठकीत लोकसभा निवडणुकीत ज्या विधनसभा मतदारसंघात मतांची आघडी मिळाली नाही त्या आमदारांना समज देण्यात आली, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दिलीप मामा लांडे यांनी सांगितली आतली बातमी

शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “लोकसभेत शिवसेनेला मिळालेले यश, आणि शिवसेनेचा मतदानाचा टक्का वाढला यासाठी आम्ही अभिनंदन करायला आलो. विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आलो आहोत. यात सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करणार, काही प्रश्न रेंगाळले असतील ते सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. मतदारांचा कौल कसा वाढेल याची व्ह्यूरचना केली. लोकसभेला मिळालेले यश हे डोक्यात न ठेवता हृदयात ठेवून समाजात जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्याकडे ते प्रश्न द्यायचे”, अशी चर्चा झाल्याची माहिती दिलीप मामा लांडे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची लोकसभेतील पराभवी उमेदवांसोबत वेगळी बैठक

शिवसेनेच्या पराभूत झालेल्या उमेदवांचीदेखील वेगळी बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक, बाबुराव कदम कोहळीकर, हेमंत पाटील (राजश्री पाटील यांचे पती), राजू पारवे (नातेवाईक वारल्यामुळे पूर्वपरवानगी घेऊन अनुपस्थित) यांना हजर राहण्याचे आदेश होते. त्यानुसार एक-दोन जण वगळता सर्वांची उपस्थिती होती. या सर्वांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत पराभवाची कारणे जाणून घेतली.

बैठकीसाठी उपस्थित आमदारांची नावे

  • 1) शंभूराजे देसाई 2) संजय राठोड 3) महेंद्र दळवी 4) आशिष जयस्वाल 5) किशोरअप्पा पाटील 6) उदय सामंत 7) योगेश कदम 8) यामिनी जाधव 9) गुलाबराव पाटील 10) बालाजी कल्याणकर 11) दादाजी भुसे 12) लता सोनावणे 13) सुहास कांदे 14) शांताराम मोरे 15) ज्ञानराज चौगुले 16) प्रदीप जयस्वाल 17) प्रताप सरनाईक 18) प्रा. रमेश बोरनारे 19) अब्दुल सत्तार 20) श्रीनिवास वनगा 21) किशोर जोरगेवार 22) भरतशेठ गोगावले 23) प्रकाश सुर्वे 24) मंगेश कुडाळकर 25) महेंद्र थोरवे 26) महेश शिंदे 27) डॉ. बालाजी किणीकर 28) नरेंद्र भोंडेकर 29) विश्वनाथ भोईर 30) मंजुळा गावित 31) तानाजी सावंत 32) संजय शिरसाट 33) संजय रायमूलकर 34) प्रकाश अबिटकर 35) चंद्रकांत पाटील 36) दीपक केसरकर 37) दिलीपमामा लांडे 38) सौ. गीता जैन 39) सदा सरवणकर

विधान परिषद

  1. 1) प्रा. मनीषा कायंदे
  2. 2) डॉ. नीलम गोऱ्हे
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.