नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस नेत्यांकडे खासगीत नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. (Shiv Sena and NCP)
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस नेत्यांकडे खासगीत नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीत अस्वस्थता असल्याचे संकेत मिळत आहेत. (Shiv Sena and NCP express dissatisfied on Nana Patole statement on independent election instead of Maha vikas aghad)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांपासून ते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंतच्या सर्वच नेत्यांनी पटोले यांच्या सुरात सूर मिसळला होता. निवडणुकीला अडीच वर्षे बाकी असताना पटोले यांनी ही भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, अशी धारणा शिवसेनेची झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीनेही अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.
पटोले काय म्हणाले होते?
नाना पटोले यांनी आपल्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. शिवसेनाही स्वबळावर लढू असं म्हणत असते. भाजपनेही स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, तरीही केवळ काँग्रेसलाच टार्गेट केलं जात आहे. मी सामना वाचत नाही, असं सांगतानाच आम्ही आमचा पक्ष वाढवत असू तर कुणाला का त्रास होतोय? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेला महत्त्व देत नसल्याचंही ते म्हणाले होते.
अमरावतीत काय म्हणाले होते?
नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी स्वबळाची घोषणा केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. नाना पटोले मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत होते. त्यावेळी त्यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं होतं.
भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं होतं.
सरकार अस्थिकर करण्याचा प्रयत्न?
काँग्रेसचे अनेक नेते स्वबळावर लढण्याच्या या मताचे आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तर तशी जाहीर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यामुळे नाना पटोले वारंवार स्वबळावर लढणार असल्याचं सांगत आहे. परिणामी शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसची ही भाषा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नच असल्याची भावना शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्याआधीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी स्वबळाची भाषा केल्यास लोक जोड्याने हाणतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तर, निवडणुका अजून लांब आहेत. त्यामुळे पटोले यांनी आताच विधान करून वातावरण क्लुषित करू नये, असं अजित पवारांचं मत असल्याचं बोललं जात आहे. (Shiv Sena and NCP express dissatisfied on Nana Patole statement on independent election instead of Maha vikas aghad)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 June 2021 https://t.co/DXYoMfiRxf #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या:
2024मध्ये युती होणार का?, विनायक राऊतांचं मौन; चर्चांना उधाण
पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!
Maharashtra News LIVE Update | औरंगाबादेत ओबीसी समाजाचे आक्रोश आंदोलन
(Shiv Sena and NCP express dissatisfied on Nana Patole statement on independent election instead of Maha vikas aghad)