Mahayuti | महायुतीत पेच वाढण्याची दाट शक्यता, नेमकी ठिणगी पडण्याचं कारण काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहे. देशात पुढच्या सहा महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात प्रचंड हालचाली घडत आहेत. असं असताना महायुतीत पेच निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

Mahayuti | महायुतीत पेच वाढण्याची दाट शक्यता, नेमकी ठिणगी पडण्याचं कारण काय?
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 9:18 PM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : राज्यात सध्या महायुतीचं सरकार सुरु आहे. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. राज्यात दीड वर्षांपूर्वी सत्तांतर घडून आलं. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारमध्ये तिसरा पक्ष सामील झाला. तीनही पक्षांकडून आपापसात चांगला संवाद असल्याचा दावा केला जातोय. पण तसं असलं तरीही तीनही पक्षांमध्ये सारं काही आलबेल नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालाचाली वाढल्या आहेत. सत्ताधारी पक्षांमध्ये जास्त जागांवर दावा सांगण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे महायुतीत आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या जागांवरुन मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांवर दावा केलाय. खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत माहिती दिलीय. पण भाजपकडून शिंदे गटाला 13 जागा देण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुतीच्या जागांसंदर्भात पार्लमेंट्री बोर्ड ठरवत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तर महायुतीमधील समन्वय समिती जागांबाबत ठरवेल. राहुल शेवाळे यांचं मत वैयक्तिक असेल, असं अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे म्हणाले आहेत.

गेल्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला काय होता?

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी महायुतीचा शिवसेनेसाठी 23 तर भाजपसाठी 25 जागा असा फॉर्म्युला ठरला होता. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 22, तर भाजप गेल्या 25 जागांवर दावा लढण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाची मागणी मान्य केली तर अजित पवार यांच्या गटाला लोकसभेसाठी केवळ एक जागा शिल्लक राहते. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचा नेमका दावा काय?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीबाबत खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती दिली. “या संपूर्ण बैठकीत शिवसेनेकडून 2019 मध्ये ज्या जागांवर निवडणूक लढवण्यात आली त्या सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी शिवसेनेकडून 22 जागांवर महायुतीचे उमेदवारांना निवडून आणण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीला शिंदे गटाचे सर्व 13 खासदार उपस्थित होते”, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

भाजपची भूमिका काय?

“एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा जातील, अजित पवार गटाला किती जागा मिळतील, आमच्याकडे किती जागा येतील किंवा घटक पक्षांना किती जागा देण्यात येतील याबाबत केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल. आमचं लक्ष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून 45 खासदांरांनी हात वर करुन उभे राहावं. हा आमचा संकल्प आहे. याकरता आम्ही काम करतोय. कोण उमेदवार येईल, कोणतं चिन्ह राहील, आमच्या महायुतीचा जो उमेदवार येईल त्याला भाजप ताकद येईल”, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

अजित पवार गटाची भूमिका काय?

“महायुतीत लोकसभेचं जागावाटप होईल. राहुल शेवाळे यांनी जे काही मत मांडलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. तीनही पक्षांची समन्वय समिती आहे. ही समन्वय समिती जागावाटपाबाबत निर्णय घेईल”, अशी भूमिका अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी मांडली.

अरविंद सावंत यांचा घणाघात

महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं पाहून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. “अजून मिध्यांची फरफट व्हायची आहे. पुढील काळात बघा काय होतं ते. मला वाटतं की एवढं थोबाडीत मारली तरी ते शुद्धीवर येत नाहीत? 48 जागा लढू ते मान्य आहे. जनताही त्याची वाट पाहत आहेत. जागा लढा, तुम्ही आपापसात कसे लढता तेही जनता बघणार आहे. ठाणे, कल्याण हे त्याचं द्योतक आहे. त्यांनी आज सांगून टाकलंय, उभं राहायचं आहे तर कमळ चिन्हावर उभे राहा. नाहीतर जागा मिळणार नाही”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.