लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपबाबत महायुतीत शिवसेनेचा निर्णय ठरला, इतक्या जागा लढवणारच

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील खासदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपबाबत महायुतीत शिवसेनेचा निर्णय ठरला, इतक्या जागा लढवणारच
CM Eknath Shinde
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 12:49 PM

गिरीश गायकवाड, मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमत झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उरलेल्या ४ जागांचे भविष्य ठरवण्याचे अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय शिवसेनेच्या संसदीय पक्षाने घेतला आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय एकमताने झाला. सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १८ जागांवर उमेदवार देण्याची शिवसेनेने तयारी सुरु केली आहे.

चर्चेचे अधिकारी एकनाथ शिंदे यांच्याकडे

जागावाटपाची चर्चा करण्याचे अधिकार पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील खासदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

प्रचाराच्या नियोजनासाठी विशेष समिती

या बैठकीत इतरही अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विशेष समिती बनविण्याचा निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. निवडणूक काळात करण्यात येणाऱ्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली विकासाची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख उद्दिष्टे असणार आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय, इतर महामंडळांची केलेली घोषणा आणि शिवडी नाव्हाशेवा सारखी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची केलेली घोषणा हे यंदाच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय यंदाच्या प्रचारात पक्षाकडून पुन्हा एकदा हिंदुत्त्वावर भर देण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेच्या खासदारांकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईकरिता विशेष समन्वय समिती जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावही मांडण्यात आला आहे. याशिवाय घटक पक्षांसोबत समन्वय साधण्यासाठीही समन्वय समिती असावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला असून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प पक्षातर्फे या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.