शिवसेनेचा पंतप्रधान! उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी ऐतिहासिक पुराव्यासह आरसा दाखवला?; काय म्हणाले?

राम मंदिर आंदोलनानंतर आम्हाला देशात अनुकूल वातावरण होतं. आम्ही लढलो असतो तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला असता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हटलं होतं.

शिवसेनेचा पंतप्रधान! उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी ऐतिहासिक पुराव्यासह आरसा दाखवला?; काय म्हणाले?
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 1:59 PM

मुंबई: राम मंदिर आंदोलनानंतर आम्हाला देशात अनुकूल वातावरण होतं. आम्ही लढलो असतो तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला असता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना राम मंदिर आंदोलनानंतर शिवसेनेने उत्तर प्रदेशात लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीची आकडेवारी दाखवत शिवसेना कशी अपयशी ठरली हे पुराव्यानिशी स्पष्ट केलं आहे,

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे खोडून काढत पलटवार केला आहे. राम मंदिर आंदोलनानंतर शिवसेनेसाठी अनुकूल लाट होती. सिमोल्लंघन केलं असंत तर दिल्लीत शिवसेनेचा झेंडा फडकला असता असं काल मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सिलेक्टिव्ह मेमरीनुसार विधान केलं. 1993च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशात 180 उमेदवार लढवले होते. जेव्हा तुमची लाट होती. तेव्हा त्यापैकी 179 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. एकाचं वाचलं होतं. 1996मध्ये तुम्ही 24 उमेदवार लढवले, त्यापैकी 23 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं. 2002 साली 39 उमेदवार लढवले. सर्व 39 उमदेवारांचे डिपॉझिट जप्त झालं. शिवसेनेची लाट होती म्हणता तरीही लोकांनी तुम्हाला नाकारलं. 1993मध्येही नाकारलं. कारण लोकांना माहीत होतं राम जन्मभूमीच्या आंदोलनात सक्रियतेने कारसेवक होते. आणि संघ विचाराचे लोकं होते. संघ विचार परिवारातील लोकं होते. म्हणून सिलेक्टिव्ह मेमरीने बोलणं बंद केलं पाहिजे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

स्वत:च्या भरवश्यावर सरकार बनवू

मुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्रातील गव्हर्नन्सवर फोकस केला पाहिजे. महाराष्ट्राची अवस्था या पूर्वी कधीही पाहिली नव्हती इतकी वाईट आहे. इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीही अनुभवलं नव्हतं. तुम्हाला चौथ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते पण त्याचा राग असा काढू नका, असं सांगतानाच भाजप स्वत:च्या भरवश्यावर आपलं सरकार बनवेल. वेगळं लढूनही भाजपच नंबर एकचा पक्ष आहे. हे आम्ही दाखवून दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

शिवसेनाप्रमुखांच्या निर्णयावर बोट दाखवत आहात का?

सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. 25 वर्ष युतीत सडलो असो ते म्हणत आहेत. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आमच्या मनात येतो, असं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांना सिलेक्टिव्ह विसरण्याची सवय आहे. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. 1984मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या:

Fadnavis on Thackeray : ठाकरे ‘सडले’ म्हणाले, आता फडणवीस म्हणतात, सेनेच्या जन्माआधी मुंबईत आमचा नगरसेवक, अख्खी कुंडली मांडली?

तेव्हा तुम्ही तोंडाची वाफ दडवत होता, अयोध्येच्या आंदोलनावर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फटकारलं, मलंगगड दाखवलं

बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? एवढी लाचारी? फडणवीसांचा हल्लाबोल!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.