शिंदे VS ठाकरे, संघर्षाला पुन्हा सुरुवात, घडामोडी वाढल्या, दसऱ्याआधी काय घडणार?

देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. या दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी आगामी काळ फार महत्त्वाचा आहे.

शिंदे VS ठाकरे, संघर्षाला पुन्हा सुरुवात, घडामोडी वाढल्या, दसऱ्याआधी काय घडणार?
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 9:33 PM

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणावरुन दोन्ही गटांमध्ये संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे. मात्र गेल्या वर्षी प्रमाणंच याही वर्षी मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे आमनेसामने आले आहेत. कारण दोन्ही गटानं शिवाजी पार्कच्या मैदानासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय. दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमनेसामने आलीय. दादरच्या शिवाजी पार्क मैदानासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही मुंबई महापालिकेकडे महिनाभरआधीच अर्ज दिलाय. त्यामुळे शिवाजी पार्कावर कोणाचा आवाज घुमणार? याकडे मुंबईकरांसह महाराष्ट्राच्या नजरा असतील. शिवसेना आणि शिवाजी पार्कावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे.

मात्र, निवडणूक आयोगाकडून सध्या शिवसेना शिंदे गटाला मिळालीय. त्यामुळे शिवाजी पार्क आम्हालाच मिळावं, अशी मागणी शिंदे गटाची आहे. गेल्या वेळीही शिंदे आणि ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आले होते. मात्र मुंबई महापालिकेनं दोन्ही गटाचे अर्ज फेटाळले आणि कोणालाही मैदानाची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवार्जी पार्कवर झाला तर शिंदे गटानं बीकेसीत मेळावा घेतला.

शिवसेनेचे पहिल्यांदाच दोन मेळावे

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या वर्षी 2 मेळावे झाले. त्यामेळाव्यातही ठाकरे आणि शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. आता शिवाजी पार्कातून कोणाची तोफ धडाडणार, हे येत्या काही दिवसांत कळेलंच. पण शिवाजी पार्कातला मेळावा शिंदे आणि ठाकरे दोघांसाठी आगामी निवडणुका पाहता महत्वाचा आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. 6 ते 7 महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कातून दसरा मेळाव्याला शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिंदे आणि ठाकरे दोघांचाही असेल. अर्थात, मुंबई महापालिकेकडून कोणाचा अर्ज मंजूर होतो, आणि कोणाला शिवाजी पार्क मैदान मिळतं? याची उत्सुकता असेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.