“आतापर्यंत ‘मातोश्री’ कुठल्या खोक्यावर चालत होती, ते…’, शिंदे गटाच्या महिला नेत्याचा सर्वात मोठा इशारा

खोक्यांच्या आरोपांवरुन शिंदे गटाच्या एका महिला प्रवक्त्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिलाय.

आतापर्यंत 'मातोश्री' कुठल्या खोक्यावर चालत होती, ते...', शिंदे गटाच्या महिला नेत्याचा सर्वात मोठा इशारा
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 5:02 PM

सुमेध साळवे, मुंबई : महाविकास आघाडीकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केलं. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या या मोर्चावर आता शिंदे गटाकडून खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सडकून टीका केलीय. विशेष म्हणजे खोक्यांच्या आरोपांवरुन शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिलाय.

“अगदी फ्रीजच्या खोक्यातून ‘मातोश्री’वर पोहोचत होते त्याबद्दल काय म्हणावं? आतापर्यंत’मातोश्री’ कुठल्या खोक्यावर चालत होती यावर आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही तीन स्टॅंडिंग चेअरमन आहोत. बोलायला लावू नका”, असा इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला.

“खासदार संजय राऊत ज्योतिषी झालेले आहेत. महाविकास आघाडीतले ते पाळीव आहेत. उद्ध्वस्त सेनेला मुंबई महानगरपालिका हातातून निघून जाईल, याची भीती वाटतेय”, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी दिली.

“मोर्चामध्ये सुषमा अंधारे कुठे होत्या? त्या दिसल्या नाहीत”, असंदेखील शीतल म्हात्रे म्हणाल्या.

“या वसुली सरकारला सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर काहीही काम नाहीय. त्यामुळे काहीही वेगवेगळे विधान करत आहेत. स्वतःच्या जीवावर आपण मोर्चा करू शकत नाही, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना सोबत घेतलं”, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

“तुम्ही महापुरुष म्हणतात, मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला तेव्हा कोणीच भाष्य केलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर महापुरुष नाहीत का?”, असा सवाल त्यांनी केला.

“काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना बुके देताना किंवा राहुल गांधी यांच्यासोबत चालताना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तुम्ही पुष्पहार केले, मात्र गांधी घराण्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घातलाय?”, असा प्रश्न त्यांनी ठाकरे गटाला उद्देशून उपस्थित केला.

“महाविकास आघाडीमधील नेत्ंयाची मानसिकता ही खचलेली आहे. आता त्यांची फक्त प्रॅक्टिकली मानसिकता थकायची बाकी राहिलीय”, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.