सेनेला ‘जय महाराष्ट्र’, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून […]
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून जनतेच्या मनावर राज्य करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! आमचे मित्र डॉ. कोल्हे यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा… pic.twitter.com/L5hCwltiUR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 1, 2019
काही दिवसांपूर्वीच डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत डॉ. कोल्हे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला होता.
कोण आहेत डॉ. अमोल कोल्हे?
शिक्षणाने डॉक्टर असलेले डॉ. अमोल कोल्हे हे मराठी सिनेमा, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील नामवंत अभिनेते आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांची मालिका खूप गाजली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेतही काम केले. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि अदराच्या स्थानी असलेल्या दोन्ही राजांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर नेमकेपणानं उभारण्याचे यशस्वी काम डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. कमी कालावधीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाली. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून त्यांची गणना होऊ लागली होती.