बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू; संजय राऊतांना विश्वास

बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on Belgaum Mahanagarpalika Election)

बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू; संजय राऊतांना विश्वास
संजय राऊत
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 10:49 AM

मुंबई: बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on Belgaum Mahanagarpalika Election)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं राऊत म्हणाले.

द्वेषबुद्धीने पालिका बरखास्त

कर्नाटक सरकारचा कार्यकर्त्यांवर दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचं ठरवलं आहे. एकीकरणकरण समितीचे अध्यक्ष अॅड. दीपक दळवी असतील किंवा काही तरुण कार्यकर्ते असतील या सर्वजणांनी मेहनत घेतली आहे. या वेळेला बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षाने होत आहे. बहुमतामध्ये सत्ता असलेली महानगर पालिका द्वेषबुद्धीने बरखास्त करण्यात आली होती. भगवा झेंडा उतरवण्यात आला होता. अशी अनेक कृत्ये कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली होती, अशी टीका त्यांनी केली.

मतदानाला सुरुवात

बेळगाव महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 375 उमेदवार रिंगणात आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी बेळगावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेजारच्या बागलकोट जिल्ह्यातून अतरिक्त कुमक मागवण्यात आली होती. राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या, गृहरक्षक दलाचे 300 जवान आणि बागलकोट तालुक्यातील पोलीस जवान याठिकाणी तैनात आहेत. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांसह बहुतेक ठिकाणी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले होते.

6 सप्टेंबरला निकाल

बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. आता सप्टेंबरला बेळगाव महानगरपालिकेचा निकाल जाहीर होईल.

पालिकेसमोर लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न

बेळगाव महानगरपालिकेसमोर (Belgaum Municipal Corporation) काही दिवसांपूर्वी लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला होता. अनधिकृत ध्वजावरुन गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण होते. त्यात कालच्या प्रकाराने अजून तणावात वाढ झाली होती. (shiv sena leader sanjay raut reaction on Belgaum Mahanagarpalika Election)

संबंधित बातम्या:

बेळगावात तब्बल 8 वर्षांनी मतदान, महापालिका निवडणुकीत मराठी अस्मिता पणाला!

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच

मध्यरात्री शिवसैनिकांचा काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाणांना फोन, नंतर मदतीची सूत्र हलली, चाळीसगाव दरड कोसळल्याच्या घटनेची आँखोदेखी

(shiv sena leader sanjay raut reaction on Belgaum Mahanagarpalika Election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.