शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट, विधानसभेत बसवला विटनेस बॉक्स

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीच्या दुसऱ्या सत्रात विटनेस बॉक्सची एन्ट्री झालीय. विधानसभेत साक्ष देणाऱ्या आमदाराला या विटनेस बॉक्समध्ये बसून किंवा उभं राहून आपला जबाब नोंदवाला लागणार आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणीच्या पहिल्या सत्रावेळी घेतलेल्या आक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट, विधानसभेत बसवला विटनेस बॉक्स
rahul narvekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 2:53 PM

कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभेत महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा जबाब आज नोंदवण्याचं काम पार पडलं आहे. तसेच शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू यांची उलट तपासणीदेखील घेतली आहे. विशेष म्हणजे विधानसभेत आता जबाब नोंदवण्यासाठी विटनेस बॉक्स लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांसमोर आज सकाळपासून सुनावणी पार पडत आहे. विधानसभेत या प्रकरणावर पहिल्या सत्राची सुनावणी पार पडली आहे. तर अडीच वाजेपासून दुसऱ्या सत्राची सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणीसाठी विधासभेच्या सभागृहात विटनेस बॉक्स बसविण्यात आला आहे.

पहिल्या सत्रात सुनील प्रभू यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी त्यांची उलट तपासणी केली. सुनील प्रभू त्यांच्या वकिलांसोबत बसले होते. यावरही शिंदे गटाने आक्षेप घेतला. साक्षीदाराला त्याच्या वकिलांबरोबर बसण्याची परवानगी देऊ नये. त्याला स्वातंत्र बसण्याची सोय करण्यात यावी. यावर अध्यक्षांनी दुसऱ्या सत्रात सोय करण्यात येईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर विधान भवनात विटनेस बॉक्स तयार करण्यात आला आहे.

सुनील प्रभू यांचे जबाब रेकॉर्ड

हा विटनेस बॉक्स सभागृहात मांडला गेला आहे. तिथे सुनील प्रभूंना आत बसण्याची परवानगी दिली जाईल. पुढच्या सुनावणीवेळी जे कोणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी समोर येतील, त्यांना त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून स्टेटमेंट देण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, वकिलांच्या शेजारी बसून सुनील प्रभू यांनी जे जबाब दिले ते रेकॉर्ड करुन घेण्यात आले. याशिवाय शिंदे गटाच्या वकिलांनी काही प्रश्न देखील विचारले. त्यावर सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं.

शिंदे गटाच्या वकिलांचा सुनील प्रभूंना महत्त्वाचा सवाल

विशेष म्हणजे या उलट तपासणीवेळी सुनील प्रभू यांना महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुमची भाजप-शिवसेनेची युती होती. त्यावेळी प्रचार करताना तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या नावाने मते मागितली का? किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली का? त्यावर सुनील प्रभूंनी एकच उत्तर दिलं. मी आमदार म्हणून जी विकासकामे केली होती त्याच आधारे मी मते मागितली होती, असं उत्तर सुनील प्रभूंनी दिलं. त्यानंतर आता विटनेस बॉक्सची व्यवस्था विधानसभेत करण्यात आली आहे. या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून किंवा बसून सुनील प्रभू किंवा इतरांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.