Shiv Sena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार आपात्रतेचा निकाल आता कधी? मोठी बातमी समोर

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

Shiv Sena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार आपात्रतेचा निकाल आता कधी? मोठी बातमी समोर
rahul narvekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 5:11 PM

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर, आता या प्रकरणी पुढच्या एक ते दोन आठवड्यात निकाल लागेल की काय? अशी चर्चा सुरु झालेली. पण शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर यावर्षी तरी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीने सुनावणी बोलावली. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आलीय.

या सुनावणीनंतर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झालीय. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी येणं कठीण आहे. संभाव्य वेळापत्रकात उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रक्रियेला किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी डिसेंबरपर्यंत येणं अवघड आहे. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण निकालात लागण्याची शक्यता आहे.

निकालाला विलंब होण्याचं कारण काय?

दोन्ही गटाकडून पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि घटना जमा करण्यात आली आहे. त्यामुळे त्या कागदपत्रांची पडताळणी करणं, आमदारांची साक्ष नोंदवणं आणि उलट तपासणी करणं ही सर्व सुनावणीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या प्रत्यक्ष सुनावनीनंतर तातडीने निर्णय देणं कठीण आहे.

विधीमंडळाचं डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन देखील आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अधिवेशनात व्यस्त असतील. त्यापूर्वी आमदारांना बोलावून त्यांची साक्ष नोंदवणं, त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या पक्षप्रमुखांना बोलावून त्यांचीसुद्धा साक्ष नोंदवणं, तसेच दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन, पुन्हा एकदा उलट तपासणी घेणं ही सर्व कारवाई विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कारवाईला कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर तातडीने निकाल जाहीर होणं कठीण आहे.

विधानसभा अध्यक्ष अहवाल सादर करणार

दोन आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी आहे. या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टात अहवाल द्यावा लागणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली, आमदारांचे साक्ष कशाप्रकारे नोंदवण्यात आले, या विषयीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टात सादर करतील.

सुनावणीत काय-काय घडलं?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी. कारण या सर्व याचिकांचा मुद्दा हा अपात्रतेचाच आहे. त्यामुळे सर्वांची सुनावणी एकत्र घ्यावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. पण त्यांच्या या युक्तिवादावर ठाकरे गटाचे वकील अनील साखरे यांनी आक्षेप घेतला. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी नको, असं ते म्हणाले. प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे आहेत आणि प्रत्येक याचिकेतील मुद्द्यांसाठी आमचे पुरावे देखील वेगवेगळे आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला.

पुढील सुनावणी कशी घेणार आहात? 34 याचिकांचं वेळापत्रक कसं असेल? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना विचारले. त्यावर अध्यक्षांनी सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सर्व वकिलांना सुचविणार आणि त्यावर सगळ्यांची मते घेणार आहे, असं सांगितलं. दरम्यान, सुनावणीआधी मुद्दे ठरवावे लागणार, असे अध्यक्षांनी म्हणताच ठाकरे गटातर्फे आक्षेप घेण्यात आला. कधीच असे झाले नाही? अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली.

पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.