Rahul Narwekar : आमदार अपात्रतेवर एक दिवस आधीच सुनावणी, कारण काय?; राहुल नार्वेकर काय म्हणाले?

मच्छीमार नगर परिसरात मोठा कोळीवाडा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण करत आहोत. या ठिकाणी आदर्श कोळीवाडा निर्माण करत आहोत. काही लोक अडथळा आणत होते, त्यांच्या कानउघाडणीची गरज होती. ती त्यावेळी केली, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

Rahul Narwekar : आमदार अपात्रतेवर एक दिवस आधीच सुनावणी, कारण काय?; राहुल नार्वेकर काय म्हणाले?
rahul narwekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 1:15 PM

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार? यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी का घेतली जात आहे याची माहिती दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी-20 परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचं मला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेची जी सुनावणी 13 ऑक्टोबरला होती. ती मी 12 ऑक्टोबर रोजी घेतली आहे. मला या विषायात कोणताही दिरंगाई करायची नाही. लवकर निर्णय घ्यायचा आहे. वेळ घालवायचा नाहीये. म्हणून उद्याच सुनावणी करणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

निर्णय प्रक्रियेवर परिणाम होणार नाही

आमदार सुनावणीबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला दिरंगाई करायची असती, वेळ काढायचा असता तर मी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं कारण सांगून सुनावणी पुढे ढकलली असती. पण मी सुनावणी आधीच घेतली. त्यामुळे मला वेळ काढायचाय की सुनावणी लवकर संपवायचीय हे तुम्हीच पाहा. माझ्यावर जी टीका होत आहे, आरोप केले जात आहेत. त्याचा हेतू काय हे मला माहीत आहे. पण अशा टीकेने माझ्या निर्णय प्रक्रियेवर फरक पडणार नाही. जे लोक टीक करत आहेत. त्यांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडायचा असेल त्यामुळे ते असं करत असावेत. तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो अशा टीकेतून माझ्यावर कोणताही दबाव पडणार नाही. पडू देणार नाही. नियमानुसारच मी निर्णय घेईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

कोणतेही आदेश आले नाही

राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र सुनावणी होणार का? असं विचारलं असता त्यांनी मला असे आदेश प्राप्त झाले नाहीत. सुनावणी कशी घ्यावी, किती दिवसात घ्यावी, त्याची काय प्रक्रिया असावी हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. शेड्युल्ड 10 हा कायदा अधिक बळकट झाला आहे. या कायद्यात संशोधन करण्याची गरज आहे. योग्य ते बदल झाल्यास कायदा बळकट होईल, असं त्यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.