राणेंची संभाजी महाराजांशी तुलना, शिवसेना आमदाराची प्रमोद जठारांविरोधात तक्रार; अटक होणार?

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी करण्यात आल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. (shiv sena mla rajan salvi file complaint against pramod jathar)

राणेंची संभाजी महाराजांशी तुलना, शिवसेना आमदाराची प्रमोद जठारांविरोधात तक्रार; अटक होणार?
प्रमोद जठार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 10:28 AM

मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी करण्यात आल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी या प्रकरणी भाजप नेते प्रमोद जठार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच जठार यांच्या अटकेची मागणीही केली आहे. त्यामुळे जठार यांना अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (shiv sena mla rajan salvi file complaint against pramod jathar)

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनीही यावेळी घोषणाबाजी केली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत राणेंची तुलना करण्यात आली होती. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राणेंवर अनेक आरोप आहेत. त्यांची तुलना संभाजी महाराजांशी तुलना करणं चुकीचं आहे, असं शिवसेना आमदार राजन साळवी म्हणाले. याप्रकरणी जठार यांना अटक केली जावी अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेना संपणार नाही

राणे यांनी कोकणात किती ही प्रयत्न केल तरी शिवसेना संपणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: कोकणात शिवसेना रुजवलेली आहे. आम्ही राणे आणि त्याच्या पुत्रांना आम्ही किंमत देत नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

काय घडलं?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. त्यानंतर राणेंविरोधात नाशिक, महाड, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून महाड पोलिसांकडे सुपुर्द केलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. (shiv sena mla rajan salvi file complaint against pramod jathar)

संबंधित बातम्या:

फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर पलटवार

वकिलांची टीम राणेंच्या घरी, सर्व खटले रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार

राणेंच्या अटकेसाठी थेट पोलिसांशी संवाद, अनिल परब अडचणीत येणार?; चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं विधान

(shiv sena mla rajan salvi file complaint against pramod jathar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.