शिवसेनेत धाकधूक वाढली, घडामोडींना वेग, दिग्गज नेते ‘वर्षा’वर ठाण मांडून, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?

शिवसेनेच्या तीन दिग्गज खासदारांची सध्या धाकधूक वाढली आहे. या खासदारांच्या उमेदवारीबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही? अशी धाकधूक या खासादारांमध्ये बघायला मिळत आहे. हे तीनही खासदार आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

शिवसेनेत धाकधूक वाढली, घडामोडींना वेग, दिग्गज नेते 'वर्षा'वर ठाण मांडून, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?
दिग्गज नेते 'वर्षा'वर ठाण मांडून, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 6:34 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सध्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या 3 खासदारांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे या तीनही खासदारांची धाकधूक वाढली आहे. हे आमदार आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. हे तीनही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेल्या काही तासांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली, यवतमाळ-वाशिम आणि नाशिक जागेसाठी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडत आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी आपल्या उमेदवारीसाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. वर्षा बंगल्यावर सध्या खलबतं सुरु आहेत.

विशेष म्हणजे यवतमाळ-वाशिमच्या जागेचा अर्ज भरण्यासाठी केवळ 2 शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आपलं तिकीट कापलं जाणार तर नाही ना? अशी धाकधूक भावना गवळींना आहे. भावना गवळी यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्याचा भाजपचा दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे 20 पदाधिकारी वर्षा बंगल्यावर दाखल आहेत. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे त्यांचा यवतमाळचा दौरा रद्द करुन मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकची जागा सोडल्यास शिवसेनेची ताकद कमी होईल, असा नेत्यांचा सूर आहे.

महायुतीत 5 ते 7 जागांवर तिढा?

दरम्यान, हेमंत गोडसे आज वर्षा बंगल्याबाहेर दाखल झाले तेव्हा त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पाच ते सात जागांवर तिढा असल्याची माहिती दिली. “महाराष्ट्रातील काही जागांवर महायुतीची चर्चा सुरु आहे. नाशिक सोबतच इतरही जागा आहेत. लवकरच सर्व राज्यस्तरीय नेते निर्णय घेतील. नाशिकची जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्या कारणास्तव शिवसेनाच लढेल. त्याचं कारण म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट आणि जो माणूस निवडून येईल, अशाच माणसाला उमेदवारी दिली जाणार आहे. ती जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे पहिलं प्राधान्य शिवसेनेला दिलं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“हा विषय नाशिकच्या जागेपुरता मर्यादीत नाही. पाच ते सात जागांवर चर्चा सुरु आहे. पण ही जागा शिवसेनेची असल्यामुळे शंभर टक्के शिवसेनेला जागा सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचावं यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही प्रचार करतोय”, असं हेमंत गोडसे यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.