शिवसेना नाव, चिन्ह आपणास मिळणार, पण… उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले…
आमची सत्ता आल्यावर एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू. महापालिका या ठिकाणी आहे. या लोकांना गाडू ही शपथ घेवून निघा. प्रवाह उलटा फिरवणारा नेता असतो. ती ताकद आपल्यात आहे. घराघरात जावून मतदार यादी तपासा. गटप्रमुखांवर मोठी जबाबदारी. प्रत्येक यादीत आघाडी मिळवून द्या.
ग्रामीण भागात चोर कंपन्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेचा धनुष्यबाण दावा सांगितला. चिन्हाचा निकाल लागणार आहे. शिवसेना हे नाव मलाच मिळणार आहे. परंतु त्यासाठी पाच पंचवीस वर्षे लागतील. आपणास मशाल चिन्ह मिळाले. त्याच्याशी साधर्म्य असलेली चिन्ह ठेवली जात आहेत. मशालीशी साधर्म्य असणारी चिन्हे ठेवू नका, अशी विनंती मी केली आहे. त्याचाही निकालास पाच पंचवीस वर्षे लागतील. परंतु आता आपल्यासोबत मुस्लिम अन् ख्रिश्चन आले आहेत, असे उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई उपऱ्याच्या हातात जाईल
जायचे असेल तर जा, दगाबाजी करू नका, शिवसैनिकांना घेवून मी ही लढाई जिंकेन. काही माजी नगरसेवक जातायत. त्यांनी आताच जावे, असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की, हे व्यापारी आपल्यात फूट पाडतायत. एवढे खाताय ते जातंय कुठे? खायला काही मर्यादा आहे की नाही? धनाढ्य व चोऱ्या माऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करतायत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का ? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्याच्या हातात जाईल.
धारावीचे टेंडर रद्द करणार
मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत. धारावीकरांना मुलूंड, दहिसर, मिठागरात टाकायचे डाव आहे. परंतु आपले सरकार आल्यावर धारावीचे टेंडरच रद्द कराणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांची कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. त्यामुळे मुंबईत पावसात सगळीकडे पाणी तुंबतंय. बीएमसीची ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिलेत ते सांगत नाहीत. एमएमआरडीएला बीएमसीतून पैसा का ? बीएमसीला भिखेला लावत आहेत.
एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू
आमची सत्ता आल्यावर एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू. महापालिका या ठिकाणी आहे. या लोकांना गाडू ही शपथ घेवून निघा. प्रवाह उलटा फिरवणारा नेता असतो. ती ताकद आपल्यात आहे. घराघरात जावून मतदार यादी तपासा. गटप्रमुखांवर मोठी जबाबदारी. प्रत्येक यादीत आघाडी मिळवून द्या.