Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | ‘…तर बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजप अध्यक्ष’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यी टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरुन ठाकरे गटावर गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांना आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.

Uddhav Thackeray | '...तर बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजप अध्यक्ष', उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 3:56 PM

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे कल्यान लोकसभाचे संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे आणि 200 ते 300 कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. “जे बोलायचं आहे ते दसरा मेळाव्यात बोलेन. ललित पाटील प्रकरणावर आमच्या नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत बोलले आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना दहशतवादी दाऊद इब्राहिमचा उल्लेख केला.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबाबत यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, “सगळ्यांना सत्य माहीत आहे. त्यावर आमचे नेते अरविंद सावंत, संजय राऊत, सुषमा अंधारे बोलत आहेत. त्यांच्याकडे (फडणवीस) प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यांच्या आरोपाला संजय राऊतांनी योग्य उत्तर दिलं आहे. जर त्या वेळेस ललित पाटील नाशिक शहर प्रमुख आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजप अध्यक्ष असल्यासारखं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘दादा भुसेंची चौकशी करा’

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “अशा प्रकारचं वक्तव्य जर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं असेल तर मला याची दया आणि कीव येते. मंत्री दादा भुसे ललित पाटील याला ‘मातोश्री’वर घेऊन आले. दादा भुसे यांचे ललित पाटील याच्याशी संबंध चांगले आहेत. या प्रकरणात दादा भुसेंची चौकशी करा”, असं संजय राऊत म्हणाले.

‘दाऊद इब्राहिम भाजपचा अध्यक्ष होता?’

“ललित पाटील नाशिकचा शहर प्रमुख होता तर मी असं म्हणू का 1992 सालीच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळी दाऊद इब्राहिम भाजपचा अध्यक्ष होता? छोटा शकील सरचिटणीस होता, अबू सालियन तुमच्या मार्गदर्शनात होता? गृहमंत्री पदाला शोभेल असं वक्तव्य करा. काही झालं तर टाकलं विरोधी पक्षावर”, अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

‘फुटीर गटाचा मुख्यमंत्र्यांनी रामलीला हटवायला सांगितली’

संजय राऊत यांनी यावेळी आझाद मैदानात शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. “परंपरागत रामलीला तिकडे होते. फुटीर गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती रामलीला हटवायला सांगितली. त्यांनी सांगितलं की रावण वध दोन दिवस आधीच करा आणि राम राज्यभिषेक नाही केला तरी चालेल. आता यांनी नवीन रामायण लिहायला घेतले आहे. जनता बघेल या रामायणाचे काय करायचे ते”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...