अनिल परब यांचा सर्वात गंभीर आरोप, पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट

मुंबई पदवीधर निवडणुकीवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आक्षेप नोंदवला आहे. ठाकरे गटाने नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब यांचा सर्वात गंभीर आरोप, पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट
ठाकरे गटाचे नेते अनिल परब
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 5:42 PM

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट येताना दिसत आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. खरंतर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर विधान परिषदेची निवडणूक व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. यासोबतच त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पदवीधर निवडणुकीवर अनिल परब यांनी आक्षेप नोंदवला आहे. ठाकरे गटाने नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. नावं का गाळली ते आम्हाला कळायला हवं, अशी भूमिका अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत मांडली.

“शिवसेनेने जी नावे नोंदणी केली होती त्यामध्ये बरीचशी आमची नावे आली. पण काही आली नाहीत. पण जी नावे आली नाहीत त्यांचे आम्ही कारणे विचारले. त्याचे कारणे आम्हाला सांगितली गेली. पण आता जो सप्लिमेंटरी रोल खूप अगोदर यायला पाहिजे होतो तो चार दिवसांआधी प्रसिद्ध झाला. या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारो नावे नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्यानंतर आमचा फॉर्म चेक केला जातो. चेक केल्यानंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की, मी फॉर्म भरला आहे. तो फॉर्म चेक करुन सबमीट झाला तरच मला स्लिप दिली जाते. माझे फॉर्म ज्यावेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला काही ऋुटी नोंदवल्या जातात. कोणते कागदपत्रे नाहीत, याबद्दल माहिती दिली जाते. अशी फॉर्म नाकारण्याची कारणे तिथेच सांगितली जातात”, असं अनिल परब म्हणाले.

‘आमच्या पक्षाची नावे ही ठरवून बाद केली’

“आता जो 40 हजारांचा रोल आला त्यामध्ये आमच्या पक्षाची नावे ही ठरवून बाद केली आहेत असं चित्र दिसत आहे. आमच्याकडे खूप स्लिप्स आहेत, ज्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेल्याची पोचपावती आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा स्वीकार होत नाही. माझ्या स्वत:च्या मुलीचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. माझ्या घरातील असे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत. अपलोड झाले आहेत, त्याची पोचपावती आली आहे. पण कुठलंही कारण न देता, मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाने नोंदवलेली नावे कट झाली आहे. भाजपने नोंदवलेली सर्व नावे आली आहेत, असा आमचा आरोप आहे”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

‘सर्वांना मतदान करायला मिळायला हवं’

“हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिथे कुलकर्णी नावाचे अधिकारी आणि कलेक्टर होते. आम्ही त्यांच्यासमोर सगळ्या बाजू मांडल्या. आमचा अर्ज नाकारण्यामागील कारण विचारलं. आता चार-पाच दिवस राहिले आहेत. सर्वांना मतदान करायला मिळायला हवं, अशी मागणी आम्ही केलेली आहे. आता ते काय करतात ते बघू. पण जी नावे आमच्या पक्षाकडून गेली आहेत ती ठरवून बाद करण्यात आली आहेत”, असा आरोप अनिल परब यांनी केला.

“आमचे शिवसैनिक पाच ते दहा फॉर्म पाठवत होते. कारण त्यांनी तशी परवानगी दिली होती. ती नावे त्यांनी रद्द केले आहेत. याशिवाय वांद्र्याला राहणाऱ्या मतदाराचं नाव मुलुंडला आलं आहे. हे ठरवून टाकली आहेत की यंत्रणेतील चूक आहे, याबाबत तपास व्हायला हवा”, असं मत अनिल परब यांनी मांडलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.