सुधीर साळवी ‘मातोश्री’वर दाखल, शिवडी मतदारसंघाबाबत मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या शिवडी विधानसभा मतदारसंघात नवा वाद निर्माण झालाय. उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. पण या मतदारसंघात सुधीर साळवी हे देखील इच्छुक आहेत. शिवडी मतदारसंघात सुधीर साळवी हे देखील ठाकरे गटाचे बडे नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या समर्थकांचा साळवी यांच्या उमेदवारीसाठी आग्रह आहे. याबाबत आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुधीर साळवी 'मातोश्री'वर दाखल, शिवडी मतदारसंघाबाबत मोठा निर्णय होणार?
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 9:01 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवी हे आज ‘मातोश्री’वर दाखल झाले. साळवी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले. सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन गेल्याची माहिती आहे. सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. पण या मतदारसंघात ठाकरे गटाचे विधीमंडळ गटनेता अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून अजय चौधरी यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे सुधीर साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील ‘मातोश्री’वर आहेत. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सुधीर साळवी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ‘मातोश्री’बाहेर निघाले आहेत. ते लालबागच्या शाखेबाहेर येऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लालबागच्या शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. “मी शिंदे गटात किंवा कुठेच जाणार नाही पण आम्ही सुधीर साळवींना अपक्ष उभा करणार. 2014 आणि 2019 ला सुधीर साळवी फिरले म्हणून तुम्ही निवडून आलात एवढं विसरू नका. त्यावेळेस ‘मातोश्री’चे आदेश पाळले. पण आता आमचं ‘मातोश्री’ने ऐकावं अन्यथा सुधीर साळवी यांना अपक्ष उभं करून आम्ही आमदार करून ‘मातोश्री’वरच घेऊन जाणार”, अशी प्रतिक्रिया लालबागच्या शाखेबाहेर असलेल्या शिवसैनिकांनी दिली.

शिवडी विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून अजय चौधरी हे आमदार आहेत. अजय चौधरी यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव करत विजय संपादीत केला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळीदेखील अजय चौधरी जिंकून आले होते. या मतदारसंघात लालबाग गणपती मंडळचे सचिव सुधीर साळवी हे देखील या निवडणुकीत इच्छुक होते. सुधीर साळवी हे ठाकरे गटाचे देखील पदाधिकारी आहेत. तसेच साळवी यांच्या समर्थकांना यावेळी उद्धव ठाकरेंकडून साळवी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी आशा होती. पण उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे साळवी यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

या मतदारसंघात मराठी भाषिक जनता मोठी आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांनादेखील या मतदारसंघात चांगलं मतदान पडतं. खरी लढत आतापर्यंत या मतदारसंघात मनसे आणि शिवसेना यांच्यात बघायला मिळाली आहे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.