‘महाराष्ट्रात भविष्यात दोनच नेते राहतील’, संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.

'महाराष्ट्रात भविष्यात दोनच नेते राहतील', संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 2:38 PM

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भविष्यात फक्त दोन नेते राहतील, असा मोठा दावा केला आहे. “मी शरद पवार यांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी 2024 च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. काही कौटुंबिक गोष्टी असतात, संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचं देखील मैदान बारामती आहे. पण बारामती शरद पवारच मारतील. महाराष्ट्रात देखील शरद पवारच असतील”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“या महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील, जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. शरद पवार आज पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत, नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘उद्धव ठाकरे दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील’

“उद्धव ठाकरे दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील. शिवसेनेच्या सर्व नेत्यांवर महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या संघटनात्मक बाजूची जबाबदारी देण्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये विभागीय नेते होते. त्या-त्या विभागाच्या संघटनात्मक बांधणीच्या जबाबदाऱ्या होत्या. जे नवीन नेते निर्माण झालेले आहेत, त्यातील प्रमुख नेत्यांसह इतर प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची घोषणा लवकरच एक ते दोन दिवसात आपल्यासमोर येईल”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“गेल्या वर्षीचा काळ जरी खडतर असला, माझी गेल्या वर्षीची दिवाळी तुरुंगात असली, तरी दिवस हे बदलत असतात. काळ खडतर आला म्हणून गुडघे टेकून रडत बसणं हे आमच्या रक्तात नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे, तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे खडतर काळ असतो तो आपल्याला टोचत नाही. काही लोक काळ आला की पळून जातात. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच्या लोकांबरोबर तुम्ही पाहिलं असेल. आम्ही सदैव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.

’56 इंच छातीचा नेता आज राहुल गांधींना घाबरतो’

“काँग्रेस नेते राहुल गांधी काय आहेत आणि भविष्यात ते कोठे जाणार आहेत याचे चित्र स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 56 इंच छातीचा नेता आज राहुल गांधींना घाबरतो. राहुल गांधींवर सातत्याने बोलतो, त्यांच्यावर चर्चा करतो, हेच राहुल गांधी यांचं यश आहे. राहुल गांधी मूर्खांचे सरदार आहेत तर बोलता कशाला? त्यांना मिळणाऱ्या पाठिंबाविषयी भय आहे म्हणून तुम्हाला जयश्री राहुल गांधी दिसतात. ही चांगली गोष्ट आहे तुम्ही काँग्रेसमुक्त करू शकला नाहीत. काँग्रेस तुमच्या बोकांडी बसली आहे. शिवसेना तुम्ही संपवली नाही. उलट शिवसेना जोमाने उभे राहिली. कोत्याही पक्षाला मुक्त करून या देशांमध्ये लोकशाही टिकणार नाही, या मताचे आम्ही आहोत. उद्या सत्तेवर आलो तर आम्ही असं म्हणणार नाही. भाजपमुक्त देश आम्हाला करायचा आहे. आम्ही त्यांना आरसा दाखवणार”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.