Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी Exclusive | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी, ‘या’ नेत्यांना संधी, राष्ट्रवादीला स्थान नाही?

मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर होण्याआधी मंत्रिमंडळ विस्तारातील 3 मंत्र्यांची नावे 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे चौथ्या मंत्रिपदासाठी दोन नेत्यांमध्ये चुरस असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tv9 मराठी Exclusive | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी, 'या' नेत्यांना संधी, राष्ट्रवादीला स्थान नाही?
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 6:32 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अखेर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारातील 3 मंत्र्यांची नावे ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागले आहेत. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच चौथ्या मंत्रीपदासाठी शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये चुरस असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना भाजप आणि शिवसेनेत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी 7 मंत्री शपथ घेणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. तसेच विस्तार कधीही होऊ शकतो, आम्हाला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अस गोगावले यांनी सांगितलंय. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारातील तीन मंत्र्यांची नावे खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. चौथ्या नावासाठी संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर यांच्यामध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थान मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून 8 ते 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिल्यास शिंदे गटाकडून मराठवाड्याला तिसरं मंत्रीपद मिळेल. त्यामुळे विदर्भाला प्राधान्य देण्यासाठी संजय रायमूलकर यांना संधी मिळू शकते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्ताराची लवकरच घोषणा होणार

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत गेल्या वर्षभरापासून सातत्याने चर्चा होतेय. महाराष्ट्रात सत्तांतरानंतर पहिल्या टप्प्यातील विस्तार पाडला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता वर्षभराने राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. सत्तेत आता तीन पक्ष भागीदार असल्यामुळे कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याशिवाय सत्ताधारी पक्षांचे आमदारही या विस्ताराकडे लक्ष केंद्रीत करुन बसले आहेत. अनेक आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. याशिवाय काही मंत्र्यांना या विस्तारात डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. पण आता अंतिम विस्तारानंतरच याबाबतचा सविस्तर खुलासा होणार आहे.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.